IND vs PAK : बॅटिंगला यायच्याआधीच घाबरलं पाकिस्तान, अब्रू वाचवण्यासाठी केली लपवाछपवी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
दुबई : आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने त्यांच्या ओपनिंग पार्टनरशीपमध्ये बदल केले आहेत. फखर झमान आणि साहिबझादा फरहान हे दोघं ओपनिंगला आले. याआधी ग्रुप स्टेजच्या पहिल्या तीनही सामन्यात सॅम अयुब ओपनिंगला बॅटिंगला आला, पण तीनही सामन्यांमध्ये सॅम अयुब शून्यवर आऊट झाला. ओमान आणि भारताविरुद्ध सॅम अयुब पहिल्या बॉलवर तर युएईविरुद्ध दुसऱ्या बॉलवर माघारी परतला.
तीनही सामन्यांमध्ये शून्य रनवर आऊट झाल्यामुळे पाकिस्तानने सुपर-4 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांची ओपनिंग जोडी बदलली. या सामन्यात सॅम अयुब तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. फखर जमानची विकेट गेल्यानंतर सॅम अयुब मैदानात आला आणि त्याने फोर मारून आशिया कपमधील त्याची पहिली रन केली.
सॅम अयुबचं लाजिरवाणं रेकॉर्ड
मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सॅम अयुब चौथ्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे. तसंच पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्य रनवर आऊट होणाऱ्या खेळाडूंमध्ये सॅम अयुब तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सॅम अयुब 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8 वेळा शून्यवर आऊट झाला. तर शाहिद आफ्रिदीही 90 टी-20 सामन्यांमध्ये 8 वेळाच शून्य रनवर माघारी परतला. पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट व्हायचा विक्रम उमर अकमलच्या नावावर आहे. उमर अकमल 79 इनिंगमध्ये 10 वेळा शून्यवर आऊट झाला.
advertisement
पहिल्याच ओव्हरमध्ये भारताची घोडचूक
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने पहिल्याच ओव्हरमध्ये घोडचूक केली. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर थर्ड मॅनवर उभ्या असणाऱ्या अभिषेक शर्माने हातातला कॅच सोडला. साहिबझादा फरहानने हार्दिकच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल फरहानच्या बॅटच्या एजला लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेने गेला, पण बॉलचा अंदाज घेण्यात अभिषेकने चूक केली आणि त्याच्या हातातून कॅच सुटला.
advertisement
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तानची प्लेयिंग इलेव्हन
सॅम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा, हुसैन तलत, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ, अबरार अहमद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : बॅटिंगला यायच्याआधीच घाबरलं पाकिस्तान, अब्रू वाचवण्यासाठी केली लपवाछपवी!