Navratri 2025: नवरात्राची पहिली माळ: देवी शैलपुत्रीची पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती

Last Updated:

navratri 2025: शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ देवींची पूजा केली जाते. यातील पहिली देवी म्हणजेच देवी शैलपुत्री. पहिली माळ पूजा विधी जाणून घेऊ.

+
नवरात्राची

नवरात्राची पहिली माळ :पहिल्या दिवशी कोणती माळ व नैवेद्य दाखवावा ते जाणून घ्या

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ देवींची पूजा केली जाते. यातील पहिली देवी म्हणजेच देवी शैलपुत्री. यंदा 22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि पहिल्या दिवशी भक्तगण देवी शैलपुत्रीची विधीपूर्वक पूजा करतील. या दिवशी देवीला कोणती माळ अर्पण करावी, नैवेद्य काय दाखवावा आणि देवी शैलपुत्रीचे महत्त्व काय आहे? याबाबत आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल18 सोबत संवाद साधताना माहिती दिली.
देवी शैलपुत्री कोण?
शैल म्हणजे पर्वत, म्हणूनच हिमालयाची कन्या पार्वतीला शैलपुत्री म्हटले जाते. भगवान शंकराची पत्नी असलेल्या या देवीचे वाहन वृषभ (नंदी बैल) आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. साधेपणा, दयाळूपणा आणि सौंदर्य यांचे मूर्तिमंत रूप असलेली ही देवी हिमालयावर विराजमान आहे. देवी शैलपुत्री कठोर तपश्चर्या करणारी, वन्य प्राण्यांची रक्षक आणि सर्व संकटांपासून मुक्ती देणारी मानली जाते.
advertisement
पहिल्या दिवशी देवीला कोणती माळ व नैवेद्य?
नवरात्रीच्या पहिल्या माळेला देवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते. तसेच या दिवशी देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशीचे विशेष महत्त्व
जो कोणी भक्त या दिवशी देवी शैलपुत्रीची भक्तिभावाने पूजा करतो, उपवास करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि देवीच्या कृपेने अपेक्षित फळ प्राप्त होते. संकटाच्या काळात देवी शैलपुत्री भक्तांचे रक्षण करते.
advertisement
धार्मिक महत्त्वाचे मार्गदर्शन
या दिवशी भक्तांनी कुंजिका स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या स्तोत्राच्या पठणाने मन शुद्ध होते आणि नवरात्रीच्या उपासनेला पूर्णता मिळते.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2025: नवरात्राची पहिली माळ: देवी शैलपुत्रीची पूजा कशी करावी? संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement