IND vs BAN : टीम इंडियासाठी व्हिलन ठरले जोशी, सुपर ओव्हरमध्ये आत्मघाती निर्णय; सेमी फायनलमध्येच भारताचा गेम ओव्हर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप रायजिंग स्टारच्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशने सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे.
दोहा : आशिया कप रायजिंग स्टारच्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशने सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे. बांगलादेशने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 194 रन केल्या तर इंडिया ए लाही 20 ओव्हरमध्ये तेवढ्याच रन करता आल्या, त्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. सुपर ओव्हरमध्ये इंडिया ए ला पहिले बॅटिंगची संधी मिळाली, पण टीम इंडियाचे कोच सुनिल जोशी यांनी आत्मघातकी निर्णय घेतला. आक्रमक बॅटर वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला पाठवण्याऐवजी सुनिल जोशी यांनी कर्णधार जितेश शर्मा आणि रमणदीप सिंग यांना बॅटिंगची संधी दिली.
जितेश शर्मा सुपर ओव्हरच्या पहिल्याच बॉलला आऊट झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी बॅटिंगला येईल, असं वाटत होतं, पण सुनिल जोशी यांनी आशुतोष शर्माला बॅटिंगला पाठवलं. आशुतोषदेखील पहिल्याच बॉलला आऊट झाल्यामुळे इंडिया ए चा सुपर ओव्हरमध्ये शून्य रनवर ऑलआउट झाला. वैभव सूर्यवंशी हा चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही त्याला बॅटिंगची संधी का दिली गेली नाही? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. या सामन्यात वैभवने 15 बॉलमध्ये 253.33 च्या स्ट्राईक रेटने 38 रन केले, ज्यात 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. सुपर ओव्हरमध्ये वैभवला बॅटिंग मिळाली असती तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता, असं मत चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.
advertisement
कोच सुनील जोशी यांनी 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशी ऐवजी टीममधील अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला, मात्र या खेळाडूंनी निराशा केली आणि भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
कोण आहेत सुनिल जोशी?
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष सुनील जोशी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कोचिंग सेटअपमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. जोशी यांची मुख्य जबाबदारी बेंगळूरु येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) येथे स्पिन बॉलिंग विभागाचे प्रमुख (Head of Spin Department) म्हणून आहे.
advertisement
इंडिया 'ए' टीमचे प्रशिक्षक म्हणून भूमिका :
बीसीसीआयच्या धोरणानुसार इंडिया 'ए', इमर्जिंग (Rising Stars) आणि 19 वर्षांखालील (U-19) संघांसाठी CoE मधील इन-हाउस प्रशिक्षकांची रोटेशन पद्धतीने नियुक्ती केली जाते. याच धोरणानुसार सुनील जोशी यांना विशिष्ट सीरिज किंवा स्पर्धांसाठी इंडिया 'ए' टीमचे मुख्य प्रशिक्षक (Chief Coach) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 'रायझिंग स्टार्स आशिया कप' स्पर्धेसाठी इंडिया 'ए' टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सुनिल जोशी यांना नियुक्त करण्यात आले होते. या भूमिकेत ते आयपीएलमधील काही युवा खेळाडूंसह उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
advertisement
सुनिल जोशींचा अनुभव
स्पिन बॉलिंगचा अनुभव : CoE मध्ये ते सध्याच्या राष्ट्रीय खेळाडूंसह युवा स्पिनरना मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.
माजी निवड समिती प्रमुख : सुनील जोशी यांनी भारतीय पुरुष senior टीमचे निवड समिती अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
कोचिंगचा अनुभव : त्यांना देशांतर्गत क्रिकेट (हैदराबाद, जम्मू आणि काश्मीर, आसाम) तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर (बांगलादेशचे स्पिन बॉलिंग सल्लागार) कोचिंगचा विस्तृत अनुभव आहे.
advertisement
खेळाडू म्हणून कारकीर्द : सुनील जोशी यांनी भारतासाठी 15 टेस्ट आणि 69 वनडे सामने खेळले आहेत.
जोशी यांच्या व्यापक अनुभवामुळे, इंडिया 'ए' स्तरावर युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्यात आणि त्यांना मानसिक तसेच तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरेल, असा विश्वास बीसीसीआयला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : टीम इंडियासाठी व्हिलन ठरले जोशी, सुपर ओव्हरमध्ये आत्मघाती निर्णय; सेमी फायनलमध्येच भारताचा गेम ओव्हर!


