Asian Games : महाराष्ट्राच्या कन्येची सोनेरी कामगिरी, टेनिसमध्ये पटकावलं सुवर्णपदक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भारताने एशियन गेम्समध्ये यावेळी आतापर्यंत ९ सुवर्णपदके पटकावली आहेत. तर १२ रौप्य पदके आणि १३ कास्यंपदकांवर नाव कोरलं आहे.
दिल्ली, 30 सप्टेंबर : चीनमधील हाँगझोऊ इथं सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताला टेनिस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळालं आहे. मिश्र दुहेरी गटात भारताने सुवर्णपदक पटकावलं असून यात महाराष्ट्राच्या कन्येचा समावेश आहे. ऋतुजा भोसले हिने रोहन बोपण्णासोबत मिळून सुवर्णपदकावर नाव कोरलं. एशियन गेम्समधलं भारताचं हे नववं सुवर्णपदक आहे.
एशियन गेम्समध्ये सातव्या दिवशी भारताच्या खात्यात नववे सुवर्णपदक जमा झाले. टेनिसमध्ये मिश्र दुहेरी प्रकारात भारताचा दिग्गज टेनिसपट्टू रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी फायनलमध्ये विजय मिळवला. त्यांनी तैपेईच्या जोडीला २-६, ६-३, १०-४ अशा फरकाने पराभूत केलं.
advertisement
पहिल्या सेटमध्ये ऋतुजा आणि रोहन बोपण्णा यांची पिछेहाट झाली. मात्र दोघांनीही पुढच्या दोन्ही सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करत तैपेईच्या जोडीला नमवलं. तिसऱ्या सेटमध्ये एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
भारताने एशियन गेम्समध्ये यावेळी आतापर्यंत ९ सुवर्णपदके पटकावली आहेत. तर १२ रौप्य पदके आणि १३ कास्यंपदकांवर नाव कोरलं आहे. एकूण ३५ पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी १०५ सुवर्ण पदके, ६३ रौप्य पदके आणि ३२ कांस्य पदके पटकावली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2023 3:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : महाराष्ट्राच्या कन्येची सोनेरी कामगिरी, टेनिसमध्ये पटकावलं सुवर्णपदक