AUS vs ENG : कांगारूंच्या विजयाने WTCत मोठा बदल, इंग्लंडची वाईट अवस्था, टीम इंडियाचं काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या (WTC) गुणतालिकेत काय बदल झाला आहे? ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर इतर संघांना याचा किती फटका बसला आहे? हे जाणून घेऊयात.
Australia vs England Perth Test WTC Points Table Change : अॅशेस टेस्ट मालिकेतील पर्थच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट राखून हा सामना जिंकला आहे. ट्रेविस हेडच्या शतकीच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसात हा सामना जिंकत इंग्लंडचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या (WTC) गुणतालिकेत काय बदल झाला आहे? ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर इतर संघांना याचा किती फटका बसला आहे? हे जाणून घेऊयात.
पर्थच्या मैदानावर इंग्लंड विरूद्ध रंगलेला पहिला टेस्ट सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी दावेदारी मजबूत केली आहे. कारण सध्या ऑस्ट्रेलियाच पहिल्या स्थानी आहे.ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 100 टक्के गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे.
🚨 THE LATEST POINTS TABLE OF ICC WTC 2025-27 🚨
- It looks like Australia is going into the final again..!!!! pic.twitter.com/fBxQRyrVsD
— Tanuj (@ImTanujSingh) November 22, 2025
advertisement
तर इंग्लंड या गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडने 6 सामन्यातून 3 सामने जिंकलेत आणि 2 हारलेत तर एक सामना ड्रॉ झाला होता. इंग्लंडचे सध्या 43.33 टक्के गुण आहेत.
टीम इंडिया कोणत्या स्थानी?
दरम्यान ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने टीम इंडियाच्या क्रमवारीत कोणतीही घसरण झाली आहे का? तर नाही. मग टीम इंडिया डब्ल्यूसी रॅकींगमध्ये कितव्या स्थानी आहे. तर टीम इंडिया या पॉईंटस टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारताने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत तर 3 हारले आहेत आणि एक सामना ड्रॉ ठरला होता. भारत 54.17 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. खरं तर भारत कोलकत्ता टेस्टपुर्वी तिसऱ्या स्थानी होता पण आफ्रिकेने केलेल्या पराभावमुळे भारताची चौथ्या स्थानी घसरण झाली होती.
advertisement
डब्ल्यूटीसीच्या या गुणतालिकेत साऊत आफ्रिका 3 सामन्यात 2 जिंकून आणि एक हार मिळवल्यामुळे दुसऱ्या स्थानी आहे. आफ्रिकेचे 66.67 गुण आहेत. सध्या आफ्रिका आणि भारत यांच्या गुवाहाटीत दुसरा टेस्ट सामना सूरू आहे.हा सामना जिंकून टीम इंडियाला वापसी करण्याची संधी आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs ENG : कांगारूंच्या विजयाने WTCत मोठा बदल, इंग्लंडची वाईट अवस्था, टीम इंडियाचं काय?


