The Ashes Test : पहिल्या ऍशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, विराटशी पंगा घेणार्याला बाहेरचा रस्ता! पॅट कमिन्सच्या जागी कॅप्टन कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia squad for the first Ashes Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक ऍशेस सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमने आपल्या 15 मेंबर स्क्वॉडची घोषणा केली आहे.
Australia vs England, first Ashes Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक ऍशेस सीरिजच्या पहिल्या मॅचसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमने आपल्या 15 खेळाडूंच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. 21 नोव्हेंबरला पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी जखमी पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथला कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आलीये. पाच टेस्ट मॅचची ही सीरिज पर्थपासून ब्रिस्बेन, ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीपर्यंत खेळली जाईल. अशातच आता ऑस्ट्रेलियाने धक्कादायक निर्णय घेतले आहेत.
जेक वेडराल्डला संधी
ऑस्ट्रेलियाच्या स्क्वॉडमध्ये नवा सलामी बॅट्समन जेक वेडराल्ड याच्यासोबत ब्रँडन डॉगेट आणि सीन ऍबॉट यांना बॅकअप पेसर म्हणून संधी मिळाली आहे. 31 वर्षांचा जेक वेडराल्ड गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग करत आहे. 2023 च्या देशांतर्गत ऍशेस सीरिजमध्ये 2-2 अशी ड्रॉ खेळणारा इंग्लंड, 2010-2011 नंतर ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही जिंकलेला नाही.
advertisement
उस्मान ख्वाजाचा सहावा सलामी जोडीदार
31 वर्षीय वेडराल्ड हा गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर उस्मान ख्वाजाचा सहावा सलामी जोडीदार बनण्याची शक्यता आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथ, नॅथन मॅकस्वीनी, सॅम कॉन्स्टास, ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन हे ओपनर म्हणून फारशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते.
The squad is in for the first #Ashes Test, but who would you have in the XI?
Read more: https://t.co/rZFeWdALi2 pic.twitter.com/jIsLsEoQ4U
— cricket.com.au (@cricketcomau) November 5, 2025
advertisement
स्टीव्ह स्मिथ कॅप्टनसी करेल
मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी वेडराल्डची सुरुवातीच्या 11 खेळाडूंमधील जागा निश्चित केलेली नाही. बेली म्हणाले, 'अजूनही प्लेइंग इलेव्हन ठरलेली नाही. साहजिकच आमच्या 15 सदस्यीय टीममधील 14 खेळाडू चौथ्या राउंडमध्ये (शेफील्ड शील्ड) खेळतील. त्यातून काही माहिती गोळा करणे बाकी आहे.' वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचनंतर पाठीच्या खालच्या भागात झालेल्या दुखापतीमुळे बॉलिंगपासून दूर असलेल्या पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ कॅप्टनसी करेल. कमिन्स टीमसोबत पर्थला जाणार असून, 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये तो टीममध्ये कमबॅक करू शकतो.
advertisement
ऑस्ट्रेलियाचा स्कॉड : स्टीव स्मिथ (कॅप्टन), सीन एबॉट, स्कॉट बोलँड, एलेक्स कैरी, ब्रँडन डॉगेट, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिश, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड आणि ब्यू वेबस्टर.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 10:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
The Ashes Test : पहिल्या ऍशेस टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, विराटशी पंगा घेणार्याला बाहेरचा रस्ता! पॅट कमिन्सच्या जागी कॅप्टन कोण?


