6,6,6,6,4,6,4,6,6,6... ऑस्ट्रेलियाने ठोकले 3 ओव्हरमध्ये 88 रन्स! पाहा 8 मिनिटांची वादळी Highlights
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia vs UAE Hong Kong Sixes 2025 : ऑस्ट्रेलियाच्या जॅक वुडने 11 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोर मारत 55 रन्सची खेळी केली. या दरम्यान, त्याने 500 च्या स्ट्राइक रेटने रन्स केले.
Australia vs UAE : हॉन्ग कॉन्ग सिक्सेस (Hong Kong Sixes) टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाने यूएईविरुद्धच्या मॅचमध्ये केवळ 18 बॉलमध्ये 10 विकेट्सने विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. पूल-बीमधील या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीचा बॅट्समन जॅक वुडने अत्यंत तुफानी बॅटिंगकेली. त्याने फक्त 11 बॉलमध्ये 55 रन्स ठोकून आपल्या टीमला पॉइंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचवले. या पूलमधील तिसरी टीम इंग्लंडची आहे.
ऑस्ट्रेलियाचे 3 ओव्हरमध्ये 88 रन्स
हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टूर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 88 रन्सचे लक्ष्य केवळ 3 ओव्हरमध्ये आणि विकेट्स न गमावता पार केले. ऑस्ट्रेलियाच्या जॅक वुडने 11 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोर मारत 55 रन्सची खेळी केली. या दरम्यान, त्याने 500 च्या स्ट्राइक रेटने रन्स केले. निक हॉब्सनने 5 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 26 रन्सची खेळी केली. यापूर्वी, यूएईला या मॅचमध्ये मोठा स्कोर उभारता आला नाही.
advertisement
यूएईचे 6 ओव्हरमध्ये 87 रन्स
आधी बॅटिंग करताना यूएईची टीम 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून केवळ 87 रन्सच करू शकली. सगीर खानने 6 बॉलमध्ये 4 सिक्स मारत 24 रन्स केले. मुहम्मद अरफानने 14 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 28 रन्सची खेळी केली. कर्णधार खालिद शाहने 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्स मारत 11 रन्स केले, तर जाहीद अलीने 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्स मारत नाबाद 17 रन्सची खेळी केली.
advertisement
पाहा Video
जॅक वुडला प्लेयर ऑफ मॅच
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून क्रिस ग्रीनने एका ओव्हरमध्ये 19 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या, तर जॅक वुडने 2 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 1 विकेट मिळवली. त्याच्या या शानदार कामगिरीबद्दल जॅक वुडला प्लेयर ऑफ मॅच (Player of Match) म्हणून निवडलं गेलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 1:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6,6,6,6,4,6,4,6,6,6... ऑस्ट्रेलियाने ठोकले 3 ओव्हरमध्ये 88 रन्स! पाहा 8 मिनिटांची वादळी Highlights


