Aus vs Eng 1st Test : ऐतिहासिक अॅशेस टेस्टला सुरूवात, पर्थवर इंग्लंडची प्रथम बॅटिंग, पाहा प्लेइंग इलेव्हन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aus vs Eng 1st Ashes Test : सध्या ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी आहे. 2023 ची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.
Australia vs England 1st Test Playing XI : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक अॅशेल मालिकेला सुरूवात झाली आहे. पर्थच्या स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जातोय. दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमधील सर्वात चिवट सामना होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच पर्थवर इंग्लंडने टॉस जिंकला असून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्क वूड आणि जॉफ्रा आर्चर या दोन बॉलिंगसह इंग्लंड आक्रमता दाखवेल. अशातच आता दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन पाहा
बेन स्टोक्स टॉस जिंकल्यावर काय म्हणाला?
आम्ही टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करू. अशा ठिकाणी जिथं जास्त क्रिकेट होत नाही. आम्ही बोर्डवर काही धावा काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही चार वेगवान गोलंदाजांसह जात आहोत आणि अर्थातच मी वेळोवेळी बॉलिंग करेल. वुडीज दुखापतीमुळे थोडा वेळ बाहेर होता पण आता तो त्यापासून मुक्त झाला आहे. त्याने बराच काळ अविश्वसनीय मेहनत घेतली आहे, असं बेन स्टोक्स म्हणाला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी
दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलियाकडे अॅशेसची ट्रॉफी आहे. 2021 च्या हंगामात संघाने पाचपैकी चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर 2023 ची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.
Australian men's Test cricketers #472 and #473
Catch the #TheAshes in 4k and with no ad-breaks during play on Kayo!#Cricket #KayoSports #Ashes pic.twitter.com/hZm2nesJL3
— Kayo Sports (@kayosports) November 21, 2025
advertisement
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.
पर्थ कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 8:02 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Aus vs Eng 1st Test : ऐतिहासिक अॅशेस टेस्टला सुरूवात, पर्थवर इंग्लंडची प्रथम बॅटिंग, पाहा प्लेइंग इलेव्हन!


