Weather Alert: दाट धुकं अन् हाडं गोठवणारी थंडी, मराठवाड्यात पारा घसरला, तापमान 10 च्या खाली!

Last Updated:
Weather update: मराठवाड्यात तापमानात मोठी घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांतील शुक्रवारचं अपडेट जाणून घेऊ.
1/5
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मराठवाड्यातील तापमानाचा पारा देखील चांगलाच घसरला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. आज 21 नोव्हेंबर रोजी देखील कोरडं हवामान आणि हाडं गोठवणारी थंडी जाणवण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, आणि बीड जिल्ह्यात शुक्रवारी आकाश निरभ्र राहणार आहे. वातावरण कोरडे आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. थंडीचा कडाका वाढणार असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

3/5
हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः आकाश निरभ्र असणार आहे, येथे देखील तापमानात घट झाल्याने काही प्रमाणात गारठा अधिक जाणवणार आहे. नांदेडमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहू शकते. गारठा वाढल्यामुळे तूर या पिकाला फायदा होऊ शकतो.

4/5
लातूर व धाराशिव जिल्ह्यात सकाळच्या वेळेला धुके दाटलेले दिसून येतील, आकाश निरभ्र असणार आहे. तसेच वातावरण कोरडे राहील. ढगांचे प्रमाण जवळजवळ शून्य असल्याने सकाळ-संध्याकाळच्या वेळेस थंडी अधिक तीव्रतेने जाणवेल. लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

5/5
गारठा वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही. मात्र थंडीचा कडाका कायम असणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement