Mitchell Marsh : वर्ल्ड कप ट्रॉफीचा अपमान? मिशेल मार्शनं त्या फोटोवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Last Updated:

वर्ल्ड कप विजयानंतर मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला होता तर एका हातात बिअरची बॉटल होती. या फोटोनंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती.

News18
News18
सिडनी, 01 डिसेंबर : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला होता. सलग सहा सामने जिंकणाऱ्या भारताचा वारू रोखत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावल्यानतंर जोरदार जल्लोष केला. यावेळी मिशेल मार्शने शेअर केलेल्या एका फोटोने वाद निर्माण झाला होता. मिशेल मार्शने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. त्याचा फोटो पॅट कमिन्सने इन्स्टावर शेअर केल्यानंतर भारतीय चाहत्यांनी टीका केली होती.
भारतीय चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनीही मिशेल मार्शला सुनावलं होतं. मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला होता तर एका हातात बिअरची बॉटल होती. मोहम्मद शमीने म्हटलं होतं की, मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवून विजेतेपदाचा अपमान केला आहे. आता मिशेल मार्शने यावर प्रतिक्रिया दिलीय.
advertisement
मार्शने फोटोबाबत ऑस्ट्रेलियाच्या सेनसोबत बोलताना म्हटलं की, त्या फोटोत कोणताही अनादर केला नाही. मी त्यावर फारसं लक्ष दिलं नाही. मी सोशल मीडियासुद्धा जास्त पाहिला नाही. त्यात असं काहीही नव्हतं आणि मला फरक पडत नाही.
मिशेल मार्शचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अलीगढच्या दिल्ली गेट पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. सायबर सेलचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं. वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारतानेही अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिलीय.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mitchell Marsh : वर्ल्ड कप ट्रॉफीचा अपमान? मिशेल मार्शनं त्या फोटोवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement