BAN vs SL, Super 4 : शेवटच्या ओव्हरचा थरार! 6 बॉलमध्ये फक्त 5 रन्स, बांगलादेशच्या कॅप्टनने सांगितलं खरी मॅच कुठं फिरली?

Last Updated:

Bangladesh vs Sri lanka, Asia Cup Super 4 : मुस्तफिजुर किती धोकादायक गोलंदाज आहे हे सर्वांना माहीत आहे. ही विकेट बॅटिंगसाठी चांगली होती, असं लिटोन दास म्हणाला.

Bangladesh Captain Litton Das
Bangladesh Captain Litton Das
Bangladesh Captain Litton Das Statement : आशिया कपमधील सुपर फोर मॅचमध्ये बांगलादेशने श्रीलंकेवर 4 विकेट्सनी थरारक विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेले 169 धावांचे लक्ष्य बांगलादेशने शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. प्रथम बॅटिंग करताना श्रीलंकेच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला पाच धावांची गरज होती. या ओव्हरमध्ये बांगलादेशच्या दोन महत्त्वाच्या विकेट गेल्याने मॅच रोमांचक झाली होती. बांगलादेशच्या विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने आपल्या टीमच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. मुस्तफिजुर रहमान आणि तस्किन अहमद यांच्या गोलंदाजीमुळेच मॅच फिरली, असं त्यानं सांगितलं.

स्कोर 190 पर्यंत जाईल असे वाटत होते, पण...

लिटन दास म्हणाला, “आशिया कपच्या आधी आम्ही काही सिरीज खेळल्या आणि आम्ही चांगली बॅटिंग केली. आम्ही सहज चेस करू शकलो. मुस्तफिजुर किती धोकादायक गोलंदाज आहे हे सर्वांना माहीत आहे. ही विकेट बॅटिंगसाठी चांगली होती. मुस्तफिजुरने टाकलेली 19 वी ओव्हर आणि तस्किनची 20 वी ओव्हर यामुळे मॅच पूर्णपणे बदलली. स्कोर 190 पर्यंत जाईल असे वाटत होते, पण त्यांनी त्याला कमी स्कोरवर रोखले. तस्किनने शेवटची ओव्हर खूप चांगली टाकली.”
advertisement

सैफ बांगलादेशला मॅच जिंकवून देऊ शकतो

सैफने केलेल्या बॅटिंगबद्दल बोलताना दास म्हणाला, “मला माहीत आहे की सैफ बांगलादेशला मॅच जिंकवून देऊ शकतो. तो UAE मध्ये चांगली कामगिरी करेल हे आम्हाला माहीत होतं. मला त्याचा स्वभाव आणि तो धावा कशा करतो हे माहीत आहे. अशाप्रकारे मॅच जिंकल्यावर पुढच्या मॅचसाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते, पण आम्हाला पुन्हा नव्या दिवसाची, नव्या टीमची आणि नव्या मॅचची तयारी करावी लागेल.”
advertisement

बांगलादेशचा 1 बॉल राखून विजय

दरम्यान, 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांचा एक खेळाडू लवकर आऊट झाला. मात्र, त्यानंतर सैफ हसन आणि लिटन दास यांनी 59 धावांची भागीदारी करून मॅच बांगलादेशच्या बाजूने आणली. त्यानंतर तौहीद हृदोयने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये नाट्यमय वळण आले, पण बांगलादेशने 1 बॉल राखून विजय मिळवला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BAN vs SL, Super 4 : शेवटच्या ओव्हरचा थरार! 6 बॉलमध्ये फक्त 5 रन्स, बांगलादेशच्या कॅप्टनने सांगितलं खरी मॅच कुठं फिरली?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement