advertisement

Team India : गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार का? अखेर BCCI ने घेतला निर्णय, पाहा काय?

Last Updated:

BCCI On Gautam Gambhir Job : गंभीरला टेस्ट टीममधून हेड कोचपदावरून काढून टाकण्याची मागणी होतीये. त्यावर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

BCCI Want gautam gambhir
BCCI Want gautam gambhir
BCCI Action On Gautam Gambhir : मी तोच व्यक्ती आहे, ज्याने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून दिला, भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीर याच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर गौतम गंभीर याने उत्तर देताना हे वक्तव्य केलं होतं. तू जबाबदारी घेऊन हेड कोचपद सोडणार का? असा सवाल विचारल्यावर गंभीरने, माझा निर्णय बीसीसीआय घेईल. गंभीर महत्त्वाचा नाही टीम इंडिया महत्त्वाची आहे, असं गंभीर म्हणाला होता. अशातच आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

हेड कोचपदावरून काढून टाकण्याची मागणी

गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा क्लीन स्वीप केल्यानंतर, आता त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गंभीरच्या कामगिरीवर आणि टीम इंडियातील प्रयोगावर अनेकजण नाराज असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता गंभीरला टेस्ट टीममधून हेड कोचपदावरून काढून टाकण्याची मागणी होतीये. त्यावर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असून बीसीसीआयच्या सुत्रांनी मोठी अपडेट दिली आहे.
advertisement

BCCI ने निर्णय काय घेतला?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गौतम गंभीरच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी गुरुवारी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटच्या भूमिकेत कायम राहणार आहे. याचा अर्थ ते त्यांच्या पदावर राहतील आणि कोणताही बदल विचारात घेतला जात नाही.
advertisement

WTC अंतिम फेरीत कसं पोहोचणार?

दरम्यान, गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला WTC स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या पराभवामुळे भारताला सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अनिश्चित स्थितीत आणलं आहे. सध्याच्या गुणतालिकेवरून पाहता, WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार का? अखेर BCCI ने घेतला निर्णय, पाहा काय?
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement