शेतकरी कन्येचा सुवर्णवेध, आई-वडिलांच्या पाठिंब्यानं गीता दुसऱ्यांदा चॅम्पियन, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शेतकरी कन्येनं मोठा संघर्ष करून महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद नेमबाजीत स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर : सध्याच्या काळात शेतकऱ्यांची मुलेही विविध क्षेत्रं गाजवत आहेत. यात मुलीही मागे नाहीत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी कन्येनं मोठं यश मिळवलंय. फुलंब्री तालुक्यातील कान्होरीच्या गीता म्हस्के हिनं महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद नेमबाज स्पर्धेत सुवर्णवेध घेतलाय. या कामगिरीमुळे ती सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलीय.
शेतकरी कन्येचा सुवर्णवेध
गीताचे आई-वडील दोघेही शेतकरी आहेत. तिची आवड जोपासण्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. आज गीता ही सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलेली आहे. गीताने 10 मी. एअर पिस्टल व 25 मी. स्पोर्ट्स पिस्टल या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक व कास्य पदक आपल्या नावे केलं. गीताला दुखापत झाल्यामुळे ती सराव करू शकत नव्हती. पण खचून न जाता व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन परत एकदा जिद्दीने जोमाने तिने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि आज ती चॅम्पियन बनलेली आहे. ती एम.जी.एम शूटिंग अकॅडमी छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण घेते.
advertisement
आई-वडिलांचं प्रोत्साहन
माझे आई-वडील दोघेही शेतकरी आहेत. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मेहनतीमुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. याचा मला खूप जास्त अभिमान आहे. आपली इच्छा आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपल्या मनातील कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो. मी माझ्या आई वडील व गुरूंचे मनापासून आभार मानते, असं गीता म्हस्के सांगते.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
December 09, 2023 11:46 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शेतकरी कन्येचा सुवर्णवेध, आई-वडिलांच्या पाठिंब्यानं गीता दुसऱ्यांदा चॅम्पियन, Video