MS Dhoni ने धोक्याने बळकावली CSK ची कॅप्टन्सी? फॅक्चर झालेला ऋतुराज चक्क फुटबॉल खेळताना दिसला, Video व्हायरल

Last Updated:

Injured Ruturaj Gaikwad Playing Football Video : ऋतुराज गायकवाड हातच्या फ्रॅक्चरमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नसला, तरी सोशल मीडियावर चाहते त्याच्या दुखापतीच्या टायमिंगवर संशय व्यक्त करत आहेत.

Injured Ruturaj Gaikwad Playing Football Video
Injured Ruturaj Gaikwad Playing Football Video
CSK Captain Ruturaj Gaikwad Ruled Out : चेन्नई सुपर किंग्स संघासाठी 18 व्या हंगामात एक मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या संघाचा सध्याचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर गेला आहे. त्यामुळे आगामी सामने आता महेंद्रसिंह धोनी यांच्या (CSK Captain) नेतृत्वाखाली खेळवले जाणार आहेत. एकीकडे ऋतुराज गायकवाड जखमी असल्याची माहिती समोर आली असताना त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

स्टीफन फ्लेमिंग म्हणतात...

गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये ऋतुराजला दुखापत झाली. त्याच्यावर खूप वेदना होत आहेत. आम्हाला एक्स-रे मिळाला, मात्र, त्यावरून काही कळालं नाही. मग त्याचा एमआरआय झाला, ज्यामध्ये त्याच्या कोपरात आणि रेडियल नेकमध्ये फ्रॅक्चर असल्याचे दिसून आलं, असं सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटलं होतं. मात्र, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ऋतुराज (Ruturaj Gaikwad Playing Football) धडधाकट असून फुटबॉल खेळताना दिसतोय.
advertisement

कॅप्टन्सी का काढली?

ऋतुराज गायकवाड आधीच स्पर्धेतून बाहेर पडला पडला असला तरी, त्याचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नक्की कधीचा आहे, याची अधिकृत माहिती नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला जातोय. यामध्ये ऋतुराज व्यवस्थित असल्याचा दावा केला जात आहे. तसेच ऋतुराज गायकवाडला काहीही झालं नसताना कॅप्टन्सी का काढली गेली? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement

धोक्याने CSK ची कॅप्टन्सी बळकावली?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून धोनीने मुद्दामहून कॅप्टन्सी काढून घेतली का? की धोक्याने CSK ची कॅप्टन्सी बळकावली? असा प्रश्न नेटकरी विचारत जात आहे. जडेजासोबत जे झालं, तेच ऋतुराजसोबत होतंय, अशी टीका देखील होताना दिसत आहे.
advertisement

दुखापतीच्या टायमिंगवर संशय

ऋतुराज गायकवाड हातच्या फ्रॅक्चरमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नसला, तरी सोशल मीडियावर चाहते त्याच्या दुखापतीच्या टायमिंगवर संशय व्यक्त करत आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या कोपराला बॉल लागला, यानंतर ऋतुराज सीएसकेसाठी 2 मॅच खेळला. या दोन्ही सामन्यामध्ये सीएसकेचं नेतृत्व करत असतानाच ऋतुराजने बॅटिंग आणि फिल्डिंगही केली, मग ऋतुराजचं कोपर अचानक आता फ्रॅक्चर कसं झालं? असा सवाल चाहत्यांकडून विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni ने धोक्याने बळकावली CSK ची कॅप्टन्सी? फॅक्चर झालेला ऋतुराज चक्क फुटबॉल खेळताना दिसला, Video व्हायरल
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement