CSK वर पुन्हा बॅन लागणार का? R Ashwin च्या सनसनाटी आरोपावर फ्रँचायझीचं उत्तर, 'फ्रॉड डील' प्रकरण आहे काय?

Last Updated:

Ravichandran Ashwin on Dewald Brevis : एप्रिल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसला जखमी गुरजपनीत सिंगच्या जागी खेळाडू म्हणून 2.2 कोटी रुपयांच्या लीग शुल्कात करारबद्ध करण्यात आलं होतं.

CSK Clarification on R Ashwin Allegation
CSK Clarification on R Ashwin Allegation
CSK Clarification on R Ashwin Allegation : चेन्नई सुपर किंग्जने (CSK) अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने याने क्रिडाविश्वाला हादरवणारा खुलासा केला आहे. अश्विनच्या आरोपावर आता चक्क चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीला उत्तर द्यावं लागलं. अश्विनने (R Ashwin) केलेल्या आरोपांना 'बकवास' (nonsense) म्हटलं आहे. अश्विनने दावा केला होता की, आयपीएल (IPL) २०२५ मध्ये डेवाल्ड ब्रेविसला (Dewald Brevis) संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे जास्त पैसे दिले. त्यानंतर आता खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

CSK ची 'फ्रॉड डील' आहे काय?

खरं तर, चेन्नईला गुरजपनीत सिंगची जागा घेण्यासाठी एका खेळाडूची गरज होती आणि गेल्या मोसमात त्याची जागा ब्रेविसने घेतली होती. अश्विनच्या म्हणण्यानुसार, अनेक संघ या युवा दक्षिण आफ्रिकन फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होते, पण सुपर किंग्जने जास्त पैसे देऊन त्याला विकत घेतले. त्यामुळे सोशल मीडियावर या कराराला 'फ्रॉड डील' (fraud deal) असंही म्हटलं गेलं.
advertisement

डेवाल्ड ब्रेविसची रिप्लेसमेंट नियमानुसार

चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अश्विनचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. एक्स (X) वर पोस्ट करून सीएसके (CSK) संघाने लिहिले की, "डेवाल्ड ब्रेविसने आयपीएल प्लेयर नियमावली २०२५-२०२७ च्या क्लॉज ६.६ नुसार रिप्लेसमेंट प्लेयर (replacement player) म्हणून करार केला होता. ब्रेविसला नियमांनुसारच संघात घेतले आहे, हे फ्रेंचायजी स्पष्ट करू इच्छिते."
advertisement

अश्विन नेमकं काय म्हटला होता?

डेवाल्ड ब्रेविससाठी आयपीएलचा दुसरा हाफ चांगला गेला होता. त्यामुळे दोन ते तीन संघ त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. पण त्यावेळी कोणताही संघ जास्त पैसे मोजायला तयार नव्हता. त्यावेळी सीएसकेने एन्ट्री केली आणि डेवाल्ड ब्रेविसला खरेदी केलं. जर मी आता संघात आलो आणि चांगली कामगिरी केली तर माझे मूल्य वाढेल. त्यामुळे मला त्या आधारावर पैसे मिळाले पाहिजेत, अशी डेवाल्ड ब्रेविसची मागणी होती, असं अश्विन म्हणाला होता.
advertisement

चेन्नई सुपर किंग्जवर बॅन लागणार?

दरम्यान, डेवाल्ड ब्रेविसच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जकडे ट्रम्प कार्ड आहेत, असं अश्विन म्हणाला. पण डेवाल्ड ब्रेविसला जास्त पैसे देऊन खरेदी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर टीका होताना दिसतीये. एकीकडे अश्विनच्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला असताना आता चेन्नई सुपर किंग्जवर बॅन आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK वर पुन्हा बॅन लागणार का? R Ashwin च्या सनसनाटी आरोपावर फ्रँचायझीचं उत्तर, 'फ्रॉड डील' प्रकरण आहे काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement