IPL 2025 : 'चंपक'मुळे BCCI अडचणीत?हायकोर्टाने क्रिकेट बोर्डाला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
IPL 2025 News : देशात आयपीएलची धुम सूरू आहे. दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पार पडत आहेत. या दरम्यान आता बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे.
IPL 2025 News : देशात आयपीएलची धुम सूरू आहे. दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने पार पडत आहेत. या दरम्यान आता बीसीसीआयच्या अडचणीत वाढ झाली आहे. बीसीसीआयला दिल्ली हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्डाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएलमध्ये एआय रोबोट कुत्र्याचे 'चंपक' असे नाव देण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस बजावली आहे. आणि त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. प्रसिद्ध बाल मासिक 'चंपक'ने बीबीसीसीआय विरोधात याचिका दाखल केली होती. चंपक मासिकाने एआय रोबोट कुत्र्याचे 'चंपक' असे नाव देण्यावर आक्षेप घेतला आहे आणि ते ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
चार आठवड्यांत उत्तर मागितले
न्यायाधीश सौरभ बॅनर्जी म्हणाले की, चंपक हे नेहमीच एक ब्रँड नेम राहिले आहे आणि त्यांनी बीसीसीआयला चार आठवड्यांत याचिकेवर लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी निश्चित केली आहे. ही याचिका दिल्ली प्रेस पत्र प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केली आहे जी १९६८ पासून चंपक मासिक प्रकाशित करत आहे.
advertisement
बीसीसीआयच्या वकिलाने विरोध केला
प्रकाशकाच्या वतीने उपस्थित असलेले वकील अमित गुप्ता म्हणाले की, रोबोट कुत्र्याचे 'चंपक' हे नाव देणे हे त्यांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे आणि त्याचे व्यावसायिक शोषण देखील आहे, कारण चंपक हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. तथापि, बीसीसीआयच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील जे साई दीपक यांनी या याचिकेला विरोध केला. ते म्हणाले की, चंपक हे एका फुलाचे नाव आहे आणि लोक रोबोट कुत्र्याला मासिकाशी नाही तर टीव्ही मालिकेतील एका पात्राशी जोडत आहेत.
advertisement
सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी तोंडी सांगितले की क्रिकेटपटू विराट कोहलीचे टोपणनाव 'चिकू' आहे, जे चंपक मासिकातील पात्रांपैकी एक आहे. त्यांनी विचारले की प्रकाशकाने त्याच्यावर कारवाई का केली नाही? हे ट्रेडमार्कचे उल्लंघन कसे आहे असे न्यायालयाने विचारले असता, प्रकाशकाच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने सांगितले की आयपीएल ही एक व्यावसायिक संस्था आहे आणि ती जाहिराती, विपणन आणि कमाईवर आधारित आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 30, 2025 11:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : 'चंपक'मुळे BCCI अडचणीत?हायकोर्टाने क्रिकेट बोर्डाला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?









