'युझीने लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका दिला', धनश्रीने पहिल्यांदाच सांगितलं डार्क सिक्रेट!

Last Updated:

डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या एमएक्स प्लेयरचा शो राईज ऍन्ड फॉलमध्ये दिसत आहे. या शोमधला धनश्रीचा परफॉर्मन्स चर्चेचा विषय ठरत आहे.

'युझीने लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका दिला', धनश्रीने पहिल्यांदाच सांगितलं डार्क सिक्रेट!
'युझीने लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका दिला', धनश्रीने पहिल्यांदाच सांगितलं डार्क सिक्रेट!
मुंबई : डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा सध्या एमएक्स प्लेयरचा शो राईज ऍन्ड फॉलमध्ये दिसत आहे. या शोमधला धनश्रीचा परफॉर्मन्स चर्चेचा विषय ठरत आहे. या शोमध्ये धनश्री वर्माने एक वक्तव्य केलं, ज्यात तिने तिचा माजी पती तसंच भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलसोबतच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली. लग्नाच्या पहिल्याच वर्षी माझ्या लक्षात आलं होतं, की हे नातं फार वर्ष चालणार नाही.
या कार्यक्रमाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शो मधली स्पर्धक कुब्रा सैतने धनश्रीला नात्याबद्दल प्रश्न विचारला. हे लग्न फार काळ टिकणार नाही? असं तुला कधी वाटलं, असा प्रश्न कुब्राने धनश्रीला विचारला. त्यावर लग्नाच्या पहिल्याच वर्षी, तो मला धोका देत असल्याचं मी दोन महिन्यांमध्येच पकडलं, असं धनश्री कुब्राला म्हणाली.
advertisement

60 कोटी घेतले नाहीत

याआधीही धनश्रीने या कार्यक्रमात आपण घटस्फोटसाठी 60 कोटींची पोटगी घेतली नसल्याचा दावा केला होता. हे अत्यंत चुकीचं आहे, आमचा घटस्फोट हा परस्पर सहमतीने झाला. मी कोणत्याही प्रकारची पोटगी घेतलेली नाही. लोक अफवा पसरवतात, पण मी कायमच चहलचा सन्मान ठेवला, असं वक्तव्य धनश्रीने केलं आहे.
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहलची भेट 2020 साली ऑनलाईन डान्स क्लासच्या वेळी झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग त्यांनी ऑगस्ट 2020 साली साखरपुडा आणि डिसेंबर 2020 ला लग्न केलं, पण मार्च 2025 मध्ये दोघंही अधिकृतपणे वेगळे झाले. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चहलने धनश्रीला घटस्फोटासाठी 4.75 कोटी रुपये पोटगी म्हणून दिली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'युझीने लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका दिला', धनश्रीने पहिल्यांदाच सांगितलं डार्क सिक्रेट!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement