Dhanashree Verma : 'यजुवेंद्रला मी रेडहँड पकडलं...', युझी चहलच्या एक्स पत्नीचा सनसनाटी आरोप, म्हणाली 'लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dhanashree Verma On Yuzvendra Chahal : एका रिअॅलिटी शोमध्ये धनश्री वर्माने सहभाग नोंदवला आहे. त्यावेळी ती इतर स्पर्धकाशी बोलताना युजवेंद्र चहल याने लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात चिटिंग केली, असा दावा केला आहे.
Dhanashree Verma On Yuzvendra Chahal cheating : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पूर्वपत्नी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्माने (Dhanashree Verma) नुकत्याच एका शोमध्ये धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. तिने चहलसोबतच्या आपल्या विवाहित आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाच्या (Divorce) अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलले, ज्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यावेळी धनश्री युजवेंद्र चहलवर सनसनाटी आरोप केले आहेत.
दुसऱ्या महिन्यातच रंगेहात पकडलं - धनश्री वर्मा
धनश्रीने खुलासा केला की तिला लग्नाच्या पहिल्याच वर्षात फसवणूक (Cheating) झाल्याचा अनुभव आला. शोमधील एका व्हायरल क्लिपमध्ये, जेव्हा को-कंटेस्टंट कुब्रा सैतने (Kubbra Sait) विचारले की, तिला रिलेशनशीप वर्क करणार नाही याची जाणीव कधी झाली? तेव्हा धनश्रीने उत्तर दिले की तिने युजवेंद्र चहलला लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका देताना रंगेहात पकडलं होतं. धनश्रीचे हे बोलणे ऐकून कुब्राला मोठा धक्का बसला.
advertisement
पहिल्या वर्षातच मला जाणीव झाली की...
धनश्री म्हणाली, 'पहिल्या वर्षातच मला जाणीव झाली की, आमचं नातं जास्त दिवस टिकणार नाही. जेव्हा मी त्यांना दुसऱ्या महिन्यात चीट करताना रंगेहात पकडलं.' तिच्या या खुलाशाने प्रेक्षक आणि सोशल मीडियावर खळबळ निर्माण झाली आहे.
Yuzi Chahal Cheated Dhanashree Verma
Dhanashree Verma made a shocking allegation, claiming that she caught her ex-husband Yuzvendra Chahal cheating just two months into their marriage. pic.twitter.com/yo34Ee8hwE
— Jeet (@JeetN25) September 29, 2025
advertisement
मी माझ्या पतीसोबत....
प्रत्येकाच्या हातात त्याची स्वतःची इज्जत असते आणि जेव्हा तुम्ही लग्नाच्या बंधनात असता, तेव्हा तुमच्यावर दुसऱ्याच्या इज्जतीची जबाबदारीही असते,' असे ती म्हणाली. 'माझ्या मनात खूप काही बोलण्याची इच्छा असूनही मी माझ्या पतीसोबत सन्मानपूर्वक वागणं चालू ठेवलं', असा दावा यापूर्वी धनश्रीने केला होता.
धनश्री चहलचा औपचारिकरित्या घटस्फोट
advertisement
दरम्यान, धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. 2025 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि मार्च 20 रोजी त्यांचा औपचारिकरित्या घटस्फोट झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dhanashree Verma : 'यजुवेंद्रला मी रेडहँड पकडलं...', युझी चहलच्या एक्स पत्नीचा सनसनाटी आरोप, म्हणाली 'लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात...'