advertisement

ENG vs PAK : 19 व्या ओव्हरला ट्विस्ट, मॅच हातात आली; सलमान आगाची एक चूक आणि पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर! काय घडलं?

Last Updated:

England vs Pakistan : 18 ओव्हरनंतर इंग्लंड जिंकेल म्हणून अनेकांना टीव्ही बंद केल्या होत्या, मात्र इथंच आला ट्विस्ट... इंग्लंडला 12 बॉलमध्ये फक्त 5 रन्स हव्या होत्या.

ENG vs PAK twist in 19th over
ENG vs PAK twist in 19th over
England into the Semis of T20 WC : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या रोमांचक सामन्यांना सुरूवात झाली आहे. अशातच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप बी मधील सामना खेळवला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने हॅरी ब्रुकच्या शतकीय खेळीच्या जोरावर पाकिस्तानचा पराभव करत 2 विकेट्सने मॅच जिंकली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये पाकिस्तान विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचलं होतं. पण कॅप्टन सलमान अली आगा याची एक चूक पाकिस्तानला भारी पडली. त्यामुळे इंग्लंड थेट समीफायनलमध्ये गेली असून पाकिस्तान जवळजवळ वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे.

इंग्लंडने सामना जिंकला खरा पण....

इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुकच्या शतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडने सामना जिंकला खरा पण हॅरी ब्रुकच्या विकेटनंतर पाकिस्तानने मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. 18 ओव्हरनंतर इंग्लंड जिंकेल म्हणून अनेकांना टीव्ही बंद केल्या होत्या, मात्र इथंच आला ट्विस्ट... इंग्लंडला 12 बॉलमध्ये फक्त 5 रन्स हव्या होत्या. विल जॅक्स मैदानाक होता. इंग्लंडच्या हातात चार विकेट्स देखील शिल्लक होत्या. पण 19 व्या ओव्हरने पाकिस्तानला मॅचमध्ये आणलं. सलमान अली आगाने स्टार स्पिनर मोहम्मद नवाझच्या हातात बॉल दिला अन् पहिल्याच बॉलवर अखेरचा शिल्लक राहिलेला बॅटर विल जॅक्स आऊट झाला.
advertisement

19 ओव्हरमध्ये मॅच फिरली

तसेच 19 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर देखील ओव्हटनची विकेट नवाझच्या गळाला लागली. तिथून मॅच फिरेल, असं सर्वांनाच वाटत होतं पण सलमान अली आगाने हत्यार टाकून दिलं होतं. 19 ओव्हरमध्ये फक्त दोन रन्स दिले अन् दोन विकेट्स मिळाल्या. आता इंग्लंडला विजयासाठी 6 बॉलमध्ये 3 रन्स हव्या होत्या आणि हातात शिल्लक होते दोन विकेट्स... पण सलमानने चूक केली.
advertisement

कॅप्टन सलमानचा निर्णय चुकला

ज्या स्पिनर्सच्या कामगिरी जोरावर मॅच खेचून आणली होती, त्याच स्पिनर्सला अखेरची ओव्हर देणं गरजेचं होतं. सलमानला रिस्क घेऊन 20 वी ओव्हर स्पिनरला ओव्हर द्यायला हवी होती पण सलमानने फास्टर बॉलर मिर्झा याला बॉल सोपवला अन् 20 ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर फोर मारू इंग्लंडने मॅच खिशात घातली. सलमानच्या या निर्णयावर आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs PAK : 19 व्या ओव्हरला ट्विस्ट, मॅच हातात आली; सलमान आगाची एक चूक आणि पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर! काय घडलं?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement