IND vs PAK : गिल आईस, अभिषेक फायर... पण त्या दोन सिक्सने फिरवली फसलेली मॅच, भारताच्या विजयाचा खरा Hero
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान भारताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.
दुबई : आशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान भारताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे भारताने दणदणीत विजय मिळवला. गिल आणि अभिषेक यांच्यात 9.5 ओव्हरमध्ये 105 रनची पार्टनरशीप झाली. अभिषेकने 39 बॉलमध्ये 74 आणि गिलने 28 बॉलमध्ये 47 रन केले.
गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली, तरी या दोघांची विकेट गेल्यानंतर मॅच फसेल असं चित्र वाटत होतं. गिलची विकेट गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव शून्य रनवर आऊट झाला, त्यानंतर अभिषेक शर्माही माघारी परतला, तर संजू सॅमसनलाही मैदानात संघर्ष करावा लागत होता. संजूने 17 बॉलमध्ये 13 रनची खेळी केली, ज्यात फक्त एका फोरचा समावेश होता.
advertisement
संजू सॅमसन आऊट झाला, तेव्हा भारताला 20 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. तसंच हार्दिक पांड्याही नुकताच मैदानात आला होता. भारत-पाकिस्तान सामन्यातल्या तणावादरम्यानही तिलक वर्मा याने मोक्याच्या क्षणी दोन सिक्स मारल्या आणि पाकिस्तानला या सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढलं. तिलक वर्माने 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फहीम अश्रफच्या बॉलिंगवर सिक्स मारला. यानंतर तिलकने 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शाहिन आफ्रिदीला आणखी एक सिक्स ठोकला. पुढच्याच बॉलला फोर मारून तिलकने भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
तिलक वर्माने 19 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले, ज्यामध्ये 2 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. अभिषेक आणि गिलच्या आक्रमक सुरूवातीनंतरही टीम इंडियाची मिडल ऑर्डर दुबईच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत होती, पण तरीही तिलक वर्माने एका बाजूने किल्ला लढवला ज्यामुळे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : गिल आईस, अभिषेक फायर... पण त्या दोन सिक्सने फिरवली फसलेली मॅच, भारताच्या विजयाचा खरा Hero