VIDEO : दोन कॅच सुटल्या, तिसरी सूटणार होती पण... गुजरातच्या दोन खेळाळूंनी घेतला श्वास रोखून धरणार झेल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. या सामन्यात गुजरात संघाने दोन कॅच सोडून मुंबईला जीवनदान दिले होते. त्यानंतर तिसरी ही कॅच सुटणार होती. पण गुजरातला अखेर ती विकेट मिळाली.
GT vs MI Eliminator : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामन्याला सुरूवात झाली आहे.या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स प्रथम गोलंदाजी करावी लागणार होती. या सामन्यात गुजरात
संघाने दोन कॅच सोडून मुंबईला जीवनदान दिले होते. त्यानंतर तिसरी ही कॅच सुटणार होती. पण गुजरातला अखेर ती विकेट मिळाली.त्यामुळे आता मुंबईचा पहिला विकेट पडला आहे.
खरं तर मुंबईच्या फलंदाजी दरम्यान रोहित शर्माच्या दोन कॅचेस गुजरातने ड्रॉप केल्या होत्या. त्यामुळे रोहितला दोनदा जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर साई सुदर्शनच्या बॉलला जॉनी बेअरस्ट्रो स्विप मारायला गेला आणि बॉल थेट सुदर्शनच्या हाती गेला होता. पण बॉल उंचावर असल्याने त्याला कॅच घेताच आला नाही. त्यामुळे त्याच्या हाताला बॉल लागून थेट कोएटजीच्या हातात गेला आणि त्याने हा झेल घेतला.अशाप्रकारे नाट्यमय पद्धतीने गुजरातला पहिली विकेट मिळाली.
advertisement
Top teamwork
Sai Sudharsan Gerald Coetzee
Jonny Bairstow departs after an entertaining 47(22).
Updates https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/Om1nYyNDAT
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
advertisement
दरम्यान जॉनी बेअरस्ट्रो 47 धावांवर बाद झाला आहे.त्याच्यानंतर आता सुर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे.त्यामुळे मुंबई आता किती धावा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (w), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), साई सुधारसन, कुसल मेंडिस (डब्ल्यू), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : दोन कॅच सुटल्या, तिसरी सूटणार होती पण... गुजरातच्या दोन खेळाळूंनी घेतला श्वास रोखून धरणार झेल