हार्दिक पंड्या 10 ओव्हर बॉलिंग टाकू शकत नाही, स्टार ऑलराउंडर ODI संघातून बाहेर; धक्कादायक अपडेट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने हार्दिक पंड्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता हार्दिकचा वर्कलोड नियंत्रित ठेवण्यात येत असून, त्याला पूर्ण 10 षटके गोलंदाजीची परवानगी देण्यात आलेली नाही.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज (शनिवारी) घोषणा करण्यात आली. संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे. वनडे संघात पुन्हा एकदा अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुंबईचा आक्रमक फलंदाज सरफराज खान यांना संधी मिळाली नाही.
advertisement
न्यूझीलंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जस्वाल
advertisement
भारतीय संघाची घोषणा करताना हार्दिक पंड्याबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) कडून हार्दिकला सध्या एका सामन्यात पूर्ण 10 षटके गोलंदाजी करण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही, अशी माहिती बीसीसीआयने संघाची घोषणा करताना दिली आहे.
advertisement
आगामी काळात होणाऱ्या ICC पुरुष टी-20 वर्ल्ड कपचा विचार करता हार्दिक पंड्याचा वर्कलोड काळजीपूर्वक व्यवस्थापित केला जात आहे. याच कारणामुळे त्याच्या गोलंदाजीवर मर्यादा ठेवण्यात आल्या असून, त्याला संपूर्ण 10 षटके टाकण्याची परवानगी सध्या देण्यात आलेली नाही.
हार्दिक पंड्या हा भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा ऑलराऊंडर असून, फलंदाजीसोबतच त्याची गोलंदाजीही संघाच्या संतुलनासाठी निर्णायक ठरते. मात्र दुखापतींचा इतिहास आणि आगामी मोठ्या स्पर्धा लक्षात घेता, बीसीसीआय कोणताही धोका घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते.
advertisement
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हार्दिकचा वापर मर्यादित गोलंदाज म्हणून किंवा परिस्थितीनुसार करण्यात येण्याची शक्यता असून, त्याच्याकडून फलंदाजीत मोठी भूमिका अपेक्षित आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाकडे हार्दिकला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठीचा एक रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 5:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक पंड्या 10 ओव्हर बॉलिंग टाकू शकत नाही, स्टार ऑलराउंडर ODI संघातून बाहेर; धक्कादायक अपडेट










