IND vs PAK: टीम इंडियाचा पाकिस्तान संघातील Agent; दुसऱ्यांदा भारताला बनवले चॅम्पियन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Asia Cup: आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करून विक्रमी विजेतेपद पटकावले. या विजयानंतर चर्चा सुरू झाली ती एका पाकिस्तानच्या खेळाडूची होय. मॅचमध्ये हॅरिस राऊफ पाकिस्तानसाठी सर्वात मोठा खलनायक ठरला. त्याच्या महागड्या गोलंदाजीमुळे आणि शेवटच्या षटकातील चुका भारताने विक्रमी नववे विजेतेपद पटकावले.
दुबई: भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विक्रमी नववे विजेतेपद मिळवले. फायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकने दमदार सुरूवात केल्यानंतर भारताच्या फिरकीपटूंनी अखेरच्या ८ ओव्हरमध्ये मॅच फिरवली आणि पाकला फक्त १४६ धावांवर रोखले.
advertisement
विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारताची सुरूवात खुप खराब झाली. आघाडीच्या एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाही. त्याच बरोबर टीम इंडियाने सातत्याने विकेट देखील गमावल्या. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढती भारताने बाजी मारील. आणि या विजयाचा हिरो ठरला तो तिलक वर्मा होय, ज्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.
advertisement
भारताला अखेरच्या षटकात १० धावांची गरज होती. अशा वेळी पाकिस्तानच्या कर्णधाराने एक मोठी चूक केली. त्याने अखेरची ओव्हर हरिस राऊफकडे दिली. ज्याची धुलाई भारताने याआधीच्या अनेक सामन्यात केली होती. राऊफ गोलंदाजीला येण्याआधी पाकिस्तानला आणखी एक झटका बसला तो म्हणजे त्यांना slow over-rateचा दंड झाला. ज्यामुळे एक खेळाडू सीमारेषेवरून हटवावा लागला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 5:26 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK: टीम इंडियाचा पाकिस्तान संघातील Agent; दुसऱ्यांदा भारताला बनवले चॅम्पियन