BCCI मध्ये नोकरी कशी मिळवायची? पगार किती असतो? जाणून घ्या...

Last Updated:

जगभरातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डामध्ये समजल्या जाणाऱ्या या बोर्डामध्ये आता लवकरच नोकरभरती केली जात आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला बीसीसीआयमध्ये नोकरी करण्याची संधी आवश्यक असते.

News18
News18
भारतामध्ये क्रिकेटचे लाखो फॅन्स आहे. भारताची क्रिकेट टीम सध्या आशिया कप मॅचमुळे चांगलीच चर्चेत आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या क्रिकेट मॅचेसमुळे भारताचं क्रिकेट बोर्ड चर्चेत राहते. भारताच्या क्रिकेट बोर्डाला बीसीसीआय (Board Of Control For Cricket In India- BCCI) असे म्हटलं जातं. जगभरातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डामध्ये समजल्या जाणाऱ्या या बोर्डामध्ये आता लवकरच नोकरभरती केली जात आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला बीसीसीआयमध्ये नोकरी करण्याची संधी आवश्यक असते.
BCCI मध्ये क्रिकेट प्रेमींना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी BCCI हा शब्द काही नवीन नाही. प्रत्येक क्रिकेट सामन्यांदरम्यान आपल्याला तो शब्द ऐकायला मिळतो. अनेकदा क्रिकेट प्रेमींना BCCI मध्ये नोकरी करायची असेल तर काय शिक्षण लागते ? नोकरी कशी मिळवायची ? असे प्रश्न पडतात. आता त्यांच्यासाठीच ही महत्त्वाची बातमी आहे. BCCI मध्ये जनरल मॅनेजर (मार्केटिंग) या पदासाठी नोकरभरती जाहीर केली होती. नोकर भरतींची माहिती क्रिकेट प्रेमींना https://www.bcci.tv/ या वेबसाईटवर मिळेल.
advertisement
BCCI मध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाते. ही भरती विविध विभागांत केली जाते, जसे की मॅनेजमेंट, कोचिंग स्टाफ, टेक्निकल टीम, मेडिकल टीम, ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग आणि मिडिया. बीसीसीआयमध्ये फक्त खेळाडू किंवा प्रशिक्षकांसाठीच नोकरभरती नसते, तर इतरही अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असते. नोकऱ्यांची माहिती बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.bcci.tv/ वर दिली जाते. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी वेगवेगळ्या असतात. त्याप्रमाणे अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
BCCI मध्ये क्रिकेटप्रेमींना नोकरी मिळवण्यासाठी बीसीसीआयच्या https://www.bcci.tv/jobs या वेबसाईटवर जाऊन जाहिरात वाचावे. त्यानंतर आपले रिझ्युमे ई-मेल करावे. काही पदांसाठी मुलाखत व परीक्षा देखील घेतली जाते. BCCI मध्ये नोकरी करणाऱ्यांना पगार हा त्यांच्या पदानुसार आणि अनुभवावर अवलंबून असतो. सुरूवातीला किमान पगार 20,000 ते 30,000 रुपये प्रतिमहिना इतका असू शकतो. मात्र पद, अनुभव आणि कौशल्य वाढत गेले की, पगार थेट लाखोंमध्ये पोहोचतो. याशिवाय, बीसीसीआय आपल्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंना (Centrally Contracted Players) स्वतंत्र वार्षिक वेतन देते. उदाहरणार्थ, ग्रेड C मधील खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपयांचे मानधन दिले जाते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI मध्ये नोकरी कशी मिळवायची? पगार किती असतो? जाणून घ्या...
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement