Asian Games : केवळ एकच मॅच खेळून टीम इंडिया कशी गेली सेमी-फायनलमध्ये? जाणून घ्या

Last Updated:

भारताने नेपाळला हरवून अगदी सहज सेमी-फायनलला प्रवेश मिळवला. ओपनर यशस्वी जैस्वालच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळच्या टीमला 23 रन्सनी हरवलं. 

News18
News18
हाँगझोऊ, 05 ऑक्टोबर : आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट टीम केवळ एक मॅच खेळून टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सेमी-फायनलमध्ये पोहोचली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया थेट क्वार्टर फायनल मॅचमध्ये उतरली. भारताने नेपाळला हरवून अगदी सहज सेमी-फायनलला प्रवेश मिळवला. ओपनर यशस्वी जैस्वालच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने नेपाळच्या टीमला 23 रन्सनी हरवलं.  केवळ एक मॅच खेळूनच भारतीय क्रिकेट टीम अंतिम 4 टीम्समध्ये कशी काय पोहोचली? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ या.
आयसीसीमधलं रँकिंग उच्च असल्याने टीम इंडियाला थेट क्वार्टर फायनलमध्ये एंट्री मिळाली होती. आता भारतीय टीम 2 मॅचेस जिंकून गोल्ड मेडलही प्राप्त करू शकते. टीम इंडिया पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेत आहे. त्याआधी भारतीय महिलांची टीम थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणारी महिला टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. आता पुरुष टीम काय करते ते पाहायचं.
advertisement
क्वार्टर फायनल मॅचमध्ये भारताने यशस्वी जैस्वालची शतकी खेळी आणि लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या शानदार बॉलिंगच्या आधारे विजय प्राप्त केला. जैस्वालने 49 बॉल्सच्या खेळीत 8 बाउंड्रीज आणि 7 सिक्सर्सच्या साह्याने 100 रन्स केले. भारताने 4 विकेट्स गमावून 202 रन्स केल्यानंतर नेपाळच्या टीमला 9 विकेट्स आणि 179 रन्सवर रोखण्यात भारताला यश आलं. त्यामुळे भारतीय टीमने सेमी-फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
advertisement
जैस्वालने कॅप्टन ऋतुराज गायकवाडसह (25 रन्स) 59 बॉल्समध्ये 103 रन्सची भागीदारी करून टीमला चांगली सुरुवात करून दिली. शिवम दुबे (नाबाद 25) आणि रिंकू सिंग (नाबाद 37) यांनी पाचव्या विकेटसाठी 22 बॉल्समध्ये 52 रन्सची भागीदारी केली आणि टीमचा स्कोअर 200च्या पलीकडे नेला. रिंकूने दोन बाउंड्रीज आणि 4 सिक्सर्स ठोकले, तर दुबेने 2 बाउंड्रीज आणि एक सिक्सर ठोकला.
advertisement
उद्दिष्टाचा पाठलाग करताना नेपाळची टीम 13व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 120 रन्ससह चांगल्या स्थितीत होती. बिश्नोईने धोकादायक ठरू शकणारा बॅट्समन दीपेंद्रसिंह ऐरी (15 बॉल्समध्ये 32 रन्स) आणि अर्शदीपने संदीप जोरा (12 बॉल्समध्ये 29 रन्स) यांना आउट करून मॅच भारताच्या बाजूने फिरवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 20 बॉल्समध्ये 45 रन्स करून भारतीय टीमला चिंतेत टाकलं होतं. बिश्नोईने 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. पदार्पणाची मॅच असलेला डावखुरा स्पिनर किशोर याने 4 ओव्हर्समध्ये 25 रन्स देऊन एक विकेट घेतली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : केवळ एकच मॅच खेळून टीम इंडिया कशी गेली सेमी-फायनलमध्ये? जाणून घ्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement