IND vs ENG : 'मला टेस्ट खेळायचं आहे',गंभीर माजी कर्णधाराला संधी देणार का? इंग्लंड दौऱ्यातून मोठी बातमी

Last Updated:

टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने पुन्हा टेस्ट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने जरी इच्छा व्यक्त केली असली तरी गौतम गंभीर त्याला संघात घेणार का? हा मोठा प्रश्न आहे.

Ajinkya rahane test
Ajinkya rahane test
India vs England 3rd Test,Day 3 : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सध्या भारत इंग्लंडमध्ये लॉर्डसवर सामना सूरू आहे. या सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने पुन्हा टेस्ट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान भारताच्या माजी कर्णधाराने जरी इच्छा व्यक्त केली असली तरी गौतम गंभीर त्याला संघात घेणार का? हा मोठा प्रश्न आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रहाणे म्हणाला की, मला अजूनही देशासाठी कसोटी खेळायची आहे. रहाणेने 6 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या काळात भारताने 4 सामने जिंकले आणि 2 अनिर्णित राहिले. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 2020/2021 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली. या काळात विराट कोहली पितृत्व रजेवर होता आणि रहाणे कार्यवाहक कर्णधार होता.
advertisement
advertisement
लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्काय स्पोर्ट्सशी अजिंक्य रहाणे बोलत होता. यावेळी रहाणे म्हणाला,सर्वप्रथम येथे असणे चांगले आहे. मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. मला कसोटी क्रिकेट खेळण्याची आवड आहे. सध्या मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. मी येथे काही दिवसांसाठी आलो आहे, म्हणून मी माझे प्रशिक्षक आणि प्रशिक्षणाचे कपडे माझ्यासोबत आणले आहेत जेणेकरून मी स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकेन.
advertisement
मी भविष्याबद्दल अजिबात विचार करत नाहीये, पण मला माहिती आहे की मी चांगली फलंदाजी करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये माझी कामगिरी चांगली होती. या रणजी ट्रॉफी हंगामातही चांगली कामगिरी झाली आहे, असे रहाणेने सांगितले आहे.
2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही मी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. निवड होणे किंवा न होणे ही वेगळी बाब आहे आणि ती निवडकर्त्यांचे काम आहे. पण मला वाटते की मी त्या वर्ल्ड टेस्ट क्रिकेट फायनलमध्ये चांगला खेळलो,असे रहाणेने ठणकावून सांगितलं.
advertisement

कसोटी कारकिर्द

अजिंक्य रहाणे 2023 पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या 85 कसोटी सामन्यांपैकी 144 डावांमध्ये 5077 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 38.46 आणि स्ट्राईक रेट 49.50 आहे. रहाणेने कसोटीत 12 शतके तसेच 26 अर्धशतके केली आहेत. या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 188 धावा आहे.आता गौतम गंभीर रहाणेला संघात घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 'मला टेस्ट खेळायचं आहे',गंभीर माजी कर्णधाराला संधी देणार का? इंग्लंड दौऱ्यातून मोठी बातमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement