ICCचा लंकेला डबल दणका! आधी बोर्ड निलंबित, आता वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय

Last Updated:

श्रीलंका बोर्डात सुरु असलेल्या गोंधळामुळे आयसीसीने अंडर १९ वर्ल्ड कपचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला.

News18
News18
अहमदाबाद, 21 नोव्हेंबर : श्रीलंका क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आयसीसीने आता मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने वर्ल्ड कपचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. २०२३ चा वर्ल्ड कप नुकताच संपला. त्यानंतर आयसीसीच्या बोर्डाची बैठक अहमदाबादमध्ये सुरू आहे. या बैठकीमध्ये श्रीलंकेबाबत निर्णय घेतला गेला. २०२४च्या सुरुवातीला अंडर १९ वर्ल्ड कप श्रीलंकेत होणार होता. मात्र आता त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने पूर्ण बोर्डावर निलंबनाची कारवाई केली होती. आयसीसीने बोर्डात सरकारचा हस्तक्षेप मानला होता आणि आयसीसीनेही बोर्ड निलंबित केलं. आता त्यानंतर यजमानपद काढून घेत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.
अंडर १९ वर्ल्ड कप १९८८ पासून खेळला जातो. आतापर्यंत १४ वेळा ही स्पर्दा झाली. यात भारतीय संघाने सर्वाधिक ५ विजेतेपदं पटकावली आहेत. स्पर्धेतील शेवटचा हंगाम २०२२ मध्ये वेस्टइंडिजमध्ये खेळला होता. तेव्हा फायनलमध्ये भारताने इंग्लंडला ४ गडी राखून नमवलं होतं.
advertisement
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, श्रीलंका बोर्डात सुरु असलेल्या गोंधळामुळे आयसीसीने अंडर १९ वर्ल्ड कपचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. तसंच १० नोव्हेंबरला श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित कऱण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. निलंबनाची कारवाई झाली असली तरी खेळावर परिणाम होणार नाही. श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. निलंबित बोर्डाकडून कामकाज पाहिलं जाईल.
अंडर १९ वर्ल्ड कप १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत खेळवला जाणार आहे..तर दक्षिण आफ्रिकेत टी२० लीगचे दुसऱ्या हंगामातील सामनेसुद्धा १० ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वर्ल्ड कप आणि टी२० लीगचे सामने ठरलेल्या शेड्युलनुसार होतील.
advertisement
अंडर १९ वर्ल्ड कप भारताने पाच वेळा, ऑस्ट्रेलियाने तीन वेळा तर पाकिस्तानने दोन वेळा जिंकला आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने एकदा विजेतेपद पटकावलं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICCचा लंकेला डबल दणका! आधी बोर्ड निलंबित, आता वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement