World Cup 2024 : वर्ल्ड कप 2024 मध्ये 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, पहिल्यांदाच खेळवला जाणार असा मुकाबला
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना झाला होता. आता पुन्हा हे दोन संघ जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आमने सामने येणार आहेत.
मुंबई, 21 डिसेंबर : भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक विरोधी संघ जेव्हा केवळ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येतात तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्यावर असते. हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा क्रिकेट सामना आहे. लाखो लोक हा सामना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असतात तर करोडो लोक हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर पाहतात. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 14 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना झाला होता. आता पुन्हा हे दोन संघ जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आमने सामने येणार आहेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश संयुक्तपणे 2024 चा टी 20 वर्ल्ड कप आयोजित करणारा आहेत. वर्ल्ड कपला अजून 6 महिने बाकी असले तरी याची उत्सुकतता आतापासूनच निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये होईल. हा सामना 8 जून किंवा 9 जून रोजी खेळवण्यात येईल. या सामन्याची अंतिम तारीख अजून ठरलेली नाही पण भारत-पाकिस्तान सामना शनिवारी किंवा रविवारी होणार आहे.
advertisement
मोठी बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दिवस-रात्र नसून सकाळी सुरू होणार आहे. अमेरिकेत सकाळी हा सामना आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे की भारतातील लोक योग्य वेळी हा सामना पाहू शकतील. अमेरिकेत सकाळ होते तेव्हा भारतात रात्र असते. भारत-पाकिस्तान सामन्याचा सर्वात मोठा चाहतावर्ग या दोन देशांमध्ये आहे, त्यामुळे हा सामना अमेरिकेत दिवसा खेळवला जाईल. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा पहिल्यांदाच दिवसा खेळवण्यात येणार आहे.
advertisement
भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने अमेरिकेतच खेळवले जातील, असा दावा देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अनेक भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत राहतात आणि टीम इंडियाचे तिथे खूप चाहते आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2023 5:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2024 : वर्ल्ड कप 2024 मध्ये 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, पहिल्यांदाच खेळवला जाणार असा मुकाबला