IND vs BAN : IPLच्या 8 स्टार्सनी लाज घालवली, सुपर ओव्हरमध्ये भोपळाही फुटला नाही,बांगलादेश फायनलमध्ये

Last Updated:

भारताने हारलेला सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला होता.त्यामुळे भारताला सामना जिंकण्याची आणखी एक संधी मिळाली होती.पण कोच सुनील जोशी यांच्या एका धक्कादायक निर्णयामुळे भारताने सुपर ओव्हरमध्ये सामना गमावला आहे.

IND vs BAN
IND vs BAN
India vs Bangladesh Semi Final : एसीसी मेन्स रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलच्या सामन्यात आयपीएलच्या स्टार खेळाडूंनी माती खाल्ली आहे.कारण भारताने हारलेला सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला होता.त्यामुळे भारताला सामना जिंकण्याची आणखी एक संधी मिळाली होती.पण कोच सुनील जोशी यांच्या एका धक्कादायक निर्णयामुळे भारताने सुपर ओव्हरमध्ये सामना गमावला आहे. विशेष म्हणजे भारताने सुपर ओव्हरमध्ये भोपळाही फोडला नाही.त्यानंतर भारताने गोलंदाजी दरम्यान वाईड बॉल टाकून बांग्लादेशला सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून दिला आहे.त्यामुळे आता बांग्लादेश सुपर ओव्हरमध्ये पोहोचली आहे.
खरं भारत आणि बांग्लादेशचा सामना ड्रॉ झाल्यानंतर तो सूपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. त्यामुळे भारताला सेमी फायनल जिंकण्याची आणखी एक संधी चालून आली होती. पण भारताचा कोच सूनील जोशी यांच्या एका निर्णयाने भारताने हा सामना गमावला होता.त्यांचं झालं असं की सूपर ओव्हरमध्ये भारताकडून वैभव सुर्यवंशीला सलामीला पाठवण्याऐवजी कोच जोशीने त्याला बेंचवर बसवलं.त्याच्याऐवजी कर्णधार जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माला फलंदाजीला पाठवले होते.
advertisement
यावेळी सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या रिपॉन मंडोलच्या पहिल्याच बॉलवर जितेश शर्मा क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर आशुतोष शर्मा एक्स्ट्रा कव्हरवर बॉल मारल्यामुळे कॅच आऊट झाला होता.त्यामुळे भारताचा डाव संपला होता.कारण सुपर ओव्हरमध्ये दोन खेळाडू आऊट झाले की इनिंग संपते.त्यामुळे भारताने शून्य धावा केल्याने बांग्लादेशसमोर 1 धावांचे आव्हान होते.
बांग्लादेशला सूपर ओव्हर जिंकण्यासाठी एक धावाचे आव्हान होते. यावेळी भारताकडून सूयर्श शर्मा गोलंदाजीला आला होता.यावेळी त्याने पहिल्याच बॉलवर यासिर अलीची विकेट घेतली होती.त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर सुयशने वाईड टाकला आणि बांग्लादेशने एकही न धावा काढता वाईड बॉलमुळ मिळालेल्या एका धावाने हा सामना जिंकला. त्यामुळे भारताच्या आयपीएल स्टार खेळाडूंनी हातात आलेली संधी गमावली.त्यामुळे आता भारताचे आव्हान संपूष्ठात आले होते.
advertisement
सुपर ओव्हरचा थरार
भारताची बॅटिंग
पहिला बॉल- जितेश शर्मा बोल्ड, भारताची पहिली विकेट
दुसरा बॉल- अशितोष शर्मा बाद
भारताचा पहिल्या दोन चेंडूत ऑलआउट
बांगलादेश बॅटिंग
पहिला बॉल- विकेट,
दुसरा बॉल- वाइड, बांगलादेशने मॅच जिंकली
दरम्यान सुपर ओव्हरआधी दोन्ही संघांनी 20 ओव्हरमध्ये प्रत्येकी 194 धावा केल्या होत्या. अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. भारताने पहिल्या ५ चेंडूत १३ धावा केल्या अ्न अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना टीम इंडियाने ३ धावा केल्या आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली होती. त्यामुळे मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये ठरवण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : IPLच्या 8 स्टार्सनी लाज घालवली, सुपर ओव्हरमध्ये भोपळाही फुटला नाही,बांगलादेश फायनलमध्ये
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement