IND vs AUS : कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात गिल नापास, 34 वर्षात पहिल्यांदाच घडलं, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर लाजिरवाणी हार

Last Updated:

ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे.कारण ऑस्ट्रेलियन भूमिवर भारताने 34 वर्षानंतर पहिल्यांदाच पहिला वनडे सामना गमावला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही लाजिरणावी बाब आहे.

shubman gill
shubman gill
India vs Australia 1st odi : पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट राखून डिएलएस मेथडनूसार भारताचा पराभव केला आहे. खरं तर पावसामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवण्यात आला होता.त्यामुळे भारत केवळ 136 धावा करू शकली होती. पण डिएलएस मेथडनूसार ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज 7 विकेटस राखून पुर्ण केले होते. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे.कारण ऑस्ट्रेलियन भूमिवर भारताने 34 वर्षानंतर पहिल्यांदाच पहिला वनडे सामना गमावला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही लाजिरणावी बाब आहे.
भारताने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा 13 ऑक्टोबर 1978 ला ऑस्ट्रेलिया भूमिवर पहिल्यांदा वनडे सामना गमावला होता.त्यानंतर 1980 ला देखील भारताने पहिला सामना गमावला होता.यानंतर 23 ऑक्टोबर 1991 ला भारताने वनडे मालिकेतला पहिला सामना हरला होता.आता 1991 नंतर तब्बल 34 वर्षानंतर म्हणजेच 2025 भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पहिला सामना गमावला आहे. शुभमन गिलचा वनडे कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. या पहिल्याच सामन्यात भारताची हार झाली आहे.
advertisement
दरम्यान 2025 मध्ये भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील हा पहिला पराभव आहे. आणि या पराभवासोबतच सलग आठ विजयांची मालिकाही संपुष्टात आली आहे.तसेच भारतीय कर्णधारांनी तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या कारकिर्दीत पहिलाच सामना गमावण्यात विराट कोहलीच नाव आघाडीवर आहे.त्याच्यानंतर शुभमन गिलचा नंबर लागतो.
कसा रंगला सामना 
भारताने डीएलएस मेथडनूसार दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज ट्रॅविस हेड अवघ्या 8 धावांवर बाद झाली होती.त्यापाठोपाठ मॅथ्यू शॉर्ट देखील 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चांगल्या लयीत असलेला जोश फिलिप्स 37 धावांवर बाद झाला.
advertisement
कर्णघार आणि सलामीवीर मिचेल मार्शमे चांगली खेळी केली. मार्शने 46 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्यासोबत मॅट रेन्शो 21 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये हे लक्ष्य सहज गाठून 7 विकेटसने हा सामना जिंकला.
भारताचा डाव 
प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात खूपच खराब झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक 38 धावा या केएल राहुलने केल्या.त्याच्या पाठोपाठ अक्षर पटेलने 31 धावांची खेळी केली.या दोन खेळाडू व्यतिरीक्त शेवटच्या क्षणी नितेश रेड्डीने केलेल्या नाबाद 19 धावा केल्या. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन गगनचुंबी षटकार लगावले. यामुळेच भारत 26 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 136 धावाच करू शकली.
advertisement
या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने अवघ्या 8 धावा केल्या. तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला आणि कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून बाद झाला. भारताच्या या डावानंतर अनेकदा पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे भारताला धावा करताना प्रचंड अडचणी आल्या होत्या. तरी देखील भारत 136 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.
advertisement
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात गिल नापास, 34 वर्षात पहिल्यांदाच घडलं, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर लाजिरवाणी हार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement