IND vs AUS : ना बॅटिंग जमते, ना बॉलिंग येते, गंभीरच्या दोन्ही फेवरेटनी दगा दिला, टीम इंडियाच्या पराभावचे व्हिलन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग अपयशी ठरली.
पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. पावसामुळे सतत व्यत्यय येत असल्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवला गेला, ज्यात भारताने पहिले बॅटिंग करताना भारताने 9 विकेट गमावून 136 रन केले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 रनचं आव्हान मिळालं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 21.1 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं 7 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक झाल्यामुळे दोघांकडेही भारतीय क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं होतं, पण या सामन्यात दोन्ही खेळाडू अपयशी ठरले. रोहित शर्मा 8 रनवर तर विराट कोहली एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न
या सामन्यात टीम इंडिया ज्या प्लेइंग इलेव्हनसह उतरली, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. टीम इंडिया या सामन्यात एकही स्पेशलिस्ट स्पिनर घेऊन उतरली नाही. आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या कुलदीप यादवला या सामन्यात बेंचवर बसवण्यात आलं होतं, त्यामुळे स्पिन बॉलिंगची जबाबदारी ऑलराऊंडर असलेल्या अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरवर आली.
advertisement
गंभीरचे दोन्ही फेवरेट फेल
या सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना खेळण्याची संधी मिळाली. नितीश कुमार रेड्डी याने या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण रेड्डी आणि राणा या दोघांनाही या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. ऑलराऊंडर असलेल्या रेड्डीने 11 बॉलमध्ये नाबाद 19 रन केले, तर बॉलिंगमध्ये त्याने 2.1 ओव्हरमध्ये 16 रन दिले, ज्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. मॅचचा निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर कर्णधार गिलने रेड्डीला बॉलिंग दिली.
advertisement
याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्येही नितीश रेड्डीने 4 पैकी 3 इनिंगमध्ये बॉलिंगच केली नव्हती, तसंच त्याला बॅटिंगचीही संधी मिळाली नव्हती. तेव्हाही नितीश कुमार रेड्डीला बॉलिंगची संधीच मिळत नसेल, तर त्याच्याऐवजी एखादा स्पेशलिस्ट बॉलर का खेळत नाही? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला होता.
हर्षित राणालाही यश नाही
हर्षित राणाच्या टीम इंडियातल्या निवडीवरून मागच्या काही काळापासून बराच वाद सुरू आहे. राणाच्या निवडीवरून टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला टार्गेट केलं जात आहे. हर्षित राणा हा तळाला बॅटिंगही करू शकतो, त्यामुळे त्याला संधी मिळत असल्याचंही बोललं गेलं, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये राणा 2 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला, तर बॉलिंगमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 27 रन दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : ना बॅटिंग जमते, ना बॉलिंग येते, गंभीरच्या दोन्ही फेवरेटनी दगा दिला, टीम इंडियाच्या पराभावचे व्हिलन!