Happy Diwali Wishes : इथं तिथं शोधण्यात वेळ घालवू नका; एका क्लिकवर खूप साऱ्या हॅप्पी दिवाळी शुभेच्छा

Last Updated:

Happy Diwali Wishesh in Marathi : आपला शुभेच्छा मेसेज सगळ्यात वेगळा असावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे इंटरनेटवर बरंच सर्च करून आपण मेसेज शोधून काढतो. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी निवडक असे दिवाळीचे शुभेच्छा मेसेज एकाच ठिकाणी देत आहोत.

News18
News18
दिवाळीचा पहिला दिवस...नरकचतुर्दशी... दिवाळीची पहिली अंघोळ. उटणं लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर एकमेकांना भेटून फराळ, मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. पण सगळ्यांनाच प्रत्यक्षात भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देता देत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या शुभेच्छा सगळ्यांपर्यंत पोहोचवतो.
आपला शुभेच्छा मेसेज सगळ्यात वेगळा असावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे इंटरनेटवर बरंच सर्च करून आपण मेसेज शोधून काढतो. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी निवडक असे दिवाळीचे शुभेच्छा मेसेज एकाच ठिकाणी देत आहोत. तुम्हाला मराठीत शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथं तुम्हाला एकापेक्षा एक मेसेज मिळतील.
जाहला आरंभ आनंद पर्वाला,
advertisement
दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
सप्तरंगात आसमंत उजळला,
चैतन्य, उत्साह मनी उसळला..
धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
याच शुभेच्छा आपणा सर्वांना..
शुभ दिवाळी!
---------------------------------------------
सडा घालून अंगणी,
रंग भरले रांगोळीत..
झेंडूच्या फुलांचे तोरण,
दिवा शोभतो दिवाळीत..
ही दिवाळी आपणास सुखकारक
आणि समृद्धीची जावो..!
advertisement
---------------------------------------------
दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी!
---------------------------------------------
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो..
दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!
---------------------------------------------
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
advertisement
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!
---------------------------------------------
यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!
---------------------------------------------
थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
advertisement
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
---------------------------------------------
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
advertisement
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली
---------------------------------------------
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!
---------------------------------------------
advertisement
अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
---------------------------------------------
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि
सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष
विसरून मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
शुभ दीपावली
---------------------------------------------
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
---------------------------------------------
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
हॅप्पी दिवाळी 2025
---------------------------------------------
“फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
---------------------------------------------
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
---------------------------------------------
आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
Happy Diwali 2025
---------------------------------------------
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Diwali Wishes : इथं तिथं शोधण्यात वेळ घालवू नका; एका क्लिकवर खूप साऱ्या हॅप्पी दिवाळी शुभेच्छा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement