IND vs AUS : गिल-गंभीरची स्ट्रॅटेजी फेल, ओव्हर कॉन्फिडन्स नडला, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं!

Last Updated:

IND vs AUS Highlights ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. पर्थमध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवला गेला.

गिल-गंभीरची स्ट्रॅटेजी फेल, ओव्हर कॉन्फिडन्स नडला, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं!
गिल-गंभीरची स्ट्रॅटेजी फेल, ओव्हर कॉन्फिडन्स नडला, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं!
पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला आहे. पर्थमध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे हा सामना 26 ओव्हरचा खेळवला गेला, पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 136/9 पर्यंतच मजल मारता आली, त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 131 रनचं आव्हान मिळालं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून पार केलं. कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक 46 रन केले, तर जॉश फिलिपने 37 आणि मॅट रॅनशॉने 21 रनची खेळी केली. तब्बल 7 महिन्यांनंतर टीम इंडिया वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली होती, पण या सामन्यात भारताने 5 मोठ्या चुका केल्या, ज्याचा फटका टीमला बसला.

विराट-रोहित फेल

विराट कोहली आणि रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरले होते, पण 7 महिन्यांनंतर या दोघांचंही कमबॅक निराशाजनक झालं. रोहित शर्मा फक्त 8 रनवर आऊट झाला, तर विराट कोहली शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपबाहेरचा बॉल खेळताना विराटने त्याची विकेट गमावली. भारताच्या टॉप ऑर्डरचे स्तंभ म्हणून विराट-रोहितकडे पाहिलं जातं, पण या दोन्ही विकेट सुरूवातीलाच गेल्यामुळे टीम इंडिया या धक्क्यातून सावरू शकली नाही.
advertisement

श्रेयस अय्यरसाठी पुन्हा तोच ट्रॅप

ऑस्ट्रेलियाने श्रेयस अय्यरसाठी पुन्हा एकदा तसाच ट्रॅप लावला. जॉश हेजलवूडने श्रेयस अय्यरला शॉर्ट बॉल टाकले, यातल्याच एका बॉलला श्रेयसने छेडलं आणि विकेट कीपरने त्याचा कॅच पकडला. 24 बॉलमध्ये 11 रन करून अय्यर आऊट झाला. पुन्हा एकदा जॉश हेजलवूडनेच अय्यरची विकेट घेतली. जॉश हेजलवूडने वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरला 57 बॉल टाकले आहेत, यात अय्यरने 18.33 च्या सरासरीने 55 रन केले आणि 3 वेळा विकेट गमावली आहे.
advertisement

बॅटिंग ऑर्डर बदलली

टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेल्यानंतर टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केले. पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला पाठवण्याऐवजी अक्षर पटेलला बॅटिंगला पाठवण्यात आलं. केएल राहुलने वनडे क्रिकेटमध्ये बराच काळ टीम इंडियाला पाचव्या क्रमांकावर सामने जिंकून दिले आहेत, तरीही त्याचा बॅटिंग क्रमांक बदलण्यात आला. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आल्यानंतर राहुलने 31 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली, ज्यामुळे भारताला 136 रनपर्यंत पोहोचता आलं. केएल राहुल या सामन्यातला टीम इंडियाचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता.
advertisement

स्पेशलिस्ट स्पिनर नाही

आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये कुलदीप यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये कुलदीप यादवला बेंचवर बसवण्यात आलं. या सामन्यात टीम इंडिया एकही स्पेशलिस्ट स्पिनर घेऊन मैदानात उतरली नव्हती. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही ऑलराऊंडरनी स्पिन बॉलिंग केली. सुंदरने 2 ओव्हरमध्ये 14 रन देऊन 1 विकेट घेतली, तर अक्षर पटेलने 4 ओव्हरमध्ये 19 रन देऊन 1 विकेट मिळवली.
advertisement

कॅप्टन बॅटिंग अन् स्ट्रॅटेजीमध्येही अपयशी

शुभमन गिल याचा वनडे टीमचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता, पण या सामन्यात गिल बॅटिंग आणि रणनीतीमध्येही अपयशी ठरला. बॅटिंगमध्ये गिलने 18 बॉलमध्ये 10 रन केले. तर कॅप्टन्सीमध्येही गिलची रणनीती फेल ठरली. ऑस्ट्रेलिया कमी रनच्या आव्हानाचा पाठलाग करत असतानाही गिलने आक्रमक फिल्डिंग लावली नाही, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अगदी सहज या रनचा पाठलाग केला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गिल-गंभीरची स्ट्रॅटेजी फेल, ओव्हर कॉन्फिडन्स नडला, टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement