Rohit Sharma : 'मैं नही दे सकता...' Live सामन्यात रोहित श्रेयसवर भडकला, स्टंप माईकमधून जगाने ऐकलं, Video

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात एका रनवरून वाद झाला. स्टंप माईकमध्ये या सगळ्या वादाचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे.

'मैं नही दे सकता...' Live सामन्यात रोहित श्रेयसवर भडकला, स्टंप माईकमधून जगाने ऐकलं, Video
'मैं नही दे सकता...' Live सामन्यात रोहित श्रेयसवर भडकला, स्टंप माईकमधून जगाने ऐकलं, Video
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 2 विकेटने पराभव झाला आहे, याचसोबत भारताने ही सीरिजही गमावली आहे. दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या बॅटिंगने निराशा केली. विराट कोहली लागोपाठ दुसऱ्या सामन्यात शून्य रनवर आऊट झाला, तर कर्णधार गिल 9 रन करून पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित आणि श्रेयस यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 113 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 264/9 पर्यंत मजल मारली.
रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात या पार्टनरशीपदरम्यान रन काढण्यावरून वादही पाहायला मिळाले. सुरूवातीला सावध बॅटिंग केल्यानंतर रोहितने एक-एक रन काढायला सुरूवात केली, पण श्रेयस अय्यरसोबत रन काढताना रोहितला अडचणीचा सामना करावा लागत होता, यानंतर रोहित आणि श्रेयस यांच्यात संभाषण झालं, जे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

रोहित-श्रेयसमध्ये काय बोलणं झालं?

advertisement
रोहित : श्रेयस, ही एक रन होती
अय्यर : 'अरे आप करके देखो, मेरे को मत बोलना फिर'
रोहित : अरे तेरे को कॉल देना पडेगा. वो सातवा ओव्हर डाल रहा है यार.
अय्यर : मुझे उसका एँगल पता नही है, कॉल दो ना
रोहित : मैं नही दे सकता, ये कॉल
advertisement
अय्यर : सामने है आपके
यानंतर रोहितने त्याची मान हलवली.
या सामन्यात शुभमन गिलसोबतच्या पार्टनरशीपवेळी रोहित शर्मा रन आऊट होताना वाचला. बेल्स उडवण्याच्या आत रोहित सुदैवाने क्रीजमध्ये पोहोचला होता. आधी जीवनदान मिळाल्यानंतर रोहितला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, त्यामुळे त्याने श्रेयस अय्यरला रन काढण्याबाबत आधीच सावध केलं.
advertisement
रोहित शर्माने 73 रनची तर श्रेयस अय्यरने 61 रनची खेळी केली. याशिवाय अक्सर पटेलने 44 आणि हर्षित राणाने नाबाद 24 रन केल्यामुळे भारताला 264 रनपर्यंत मजल मारता आली, पण शेवटी टीम इंडियाला हा स्कोअरही कमी पडला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. खराब फिल्डिंगचा फटकाही टीम इंडियाला या सामन्यात बसला. भारतीय फिल्डर्सनी इनिंगमध्ये 3 कॅच सोडले, यातले 2 कॅच एकट्या मॅथ्यू शॉर्टचे होते. या दोन लाईफलाईनचा शॉर्टने फायदा उचलला आणि 74 रनची खेळी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'मैं नही दे सकता...' Live सामन्यात रोहित श्रेयसवर भडकला, स्टंप माईकमधून जगाने ऐकलं, Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement