Suryakumar Yadav : सूर्याचाही ऑस्ट्रेलियाला तडाखा; एका ओव्हरमध्ये 4 षटकार, असे करणारा तिसराच भारतीय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सूर्यकुमार यादवने डावाच्या 44व्या षटकात सलग चार षटकार मारले. कॅमेरून ग्रीनच्या षटकात त्याच्या या फटकेबाजीने सर्वांनाच थक्क केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना इंदौरमधील होळकर स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ४०० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची शतके तर सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ३९९ धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर गिल आणि अय्यर लागोपाठ बाद झाले. तेव्हा इशान किशन आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. पण इशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडला.
सूर्यकुमार यादवने डावाच्या 44व्या षटकात सलग चार षटकार मारले. कॅमेरून ग्रीनच्या षटकात त्याच्या या फटकेबाजीने सर्वांनाच थक्क केले. ४४ व्या षटकातील पहिले चारही चेंडू सूर्यकुमार यादवने स्टेडिममध्ये मारले. तर शेवटच्या दोन चेंडूवर दोन धावा काढल्या.
advertisement
6⃣6⃣6⃣6⃣
The crowd here in Indore has been treated with Signature SKY brilliance! #TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar pic.twitter.com/EpjsXzYrZN
— BCCI (@BCCI) September 24, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादवने दुसऱ्या सामन्यात अवघ्या ३७ चेंडूत ७२ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. एका ओव्हरमध्ये सलग चार षटकार मारणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी जहीर खान आणि रोहित शर्मा यांनी केली आहे.
advertisement
जहीर खानने झिम्बॉब्वेविरुद्ध २००० मध्ये अशी कामगिरी केली होती. तर रोहित शर्माने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात चार षटकार मारले होते. आता या यादीत सूर्यकुमार यादवचे नावही समाविष्ट झाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2023 6:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : सूर्याचाही ऑस्ट्रेलियाला तडाखा; एका ओव्हरमध्ये 4 षटकार, असे करणारा तिसराच भारतीय