Shreyas Iyer : अय्यरने आऊट झाल्याचं समजून मैदान सोडलं, पण पंचांनी दिलं नॉटआऊट; काय घडलं?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने ९० चेंडूत १०५ धावा केल्या. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.
इंदौर, 24 सप्टेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पुरेपूर समाचार घेतला. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने ४० षटकातच ३०० धावांचा टप्पा गाठला. भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने ९० चेंडूत १०५ धावा केल्या. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.
डावाच्या ३१ व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज सीन एबॉटने शतक केलेल्या श्रेयस अय्यरला तिसरा चेंडू टाकला. तेव्हा श्रेयसने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण उंच उडालेला चेंडू सीन एबॉटच्या दिशेने गेला. एबॉटने झेप घेत चेंडू हातात झेलला. यावेळी अय्यर पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. श्रेयस अय्यर खेळपट्टीवरून पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना प्रेक्षकांच्या दिशेने त्याने बॅट उंचावून अभिवादन केलं. प्रेक्षकांनीही त्याचे उभा राहून अभिनंदन केलं. दरम्यान, अचानक तो थांबला. अय्यरच्या विकेटबाबत रिप्ले दाखवला जात होता.
advertisement
Shreyas Iyer is Out at 105!
But what an innings.
This century says that Shreyas Iyer is always better than Suryakumar Yadav ODIs.
Common Sense Of Cricket!!!#ShreyasIyer#ShubhmanGill #INDvsAUS#IndvAus pic.twitter.com/Lb1MoXWLCF
— Kumaril bhatt (@BhattKumaril) September 24, 2023
advertisement
तिसऱ्या पंचांनी पाहिलं की सीन एबॉटने झेप घेतली आणि चेंडू झेलला त्यानतंर एबॉट खाली पडला. त्यावेळी त्याचा हात जमिनीला लागला. पंचांनी यावेळी पुन्हा पुन्हा रिप्ले पाहिला. शेवटी एबॉटच्या हातातला चेंडू जमिनीला लागल्याचं दिसलं आणि अय्यरला पुन्हा फलंदाजीला बोलावण्यात आलं.
अय्यरने मैदानात परत येताच सीन एबॉटच्या गोलंदाजीवर चौकार मारला. मात्र त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. मॅथ्यू शॉर्टने त्याचा झेल घेतला. श्रेयस अय्यरने शुभमन गिलसोबत २०० धावांची भागिदारी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2023 6:11 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : अय्यरने आऊट झाल्याचं समजून मैदान सोडलं, पण पंचांनी दिलं नॉटआऊट; काय घडलं?