Ind vs Aus 2nd T20 : मेलबर्नवर सूर्याने पुन्हा केली घोडचूक, टॉसवेळी काय घेतला निर्णय? पाहा टीम इंडियाची Playing 11

Last Updated:

India vs Australia 2nd T20 Playing 11 : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये कोणताही बदल झाला नाही.

India vs Australia 2nd T20 Playing 11
India vs Australia 2nd T20 Playing 11
India vs Australia 2nd T20 Match Playing 11, Full Squad : मेहबर्न इथं होत असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने पुन्हा टॉस गमावला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. टीम इंडियाला आक्रमक अंदाजात खेळावं लागणार आहे. पावसामुळे कमी ओव्हरची मॅच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभिषेक शर्माची बॅट तळपळणं गरजेची आहे. पण टीम सिलेक्शनवेळी सूर्याने पुन्हा घोडचूक केली. सूर्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला संधी दिली नाही.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, सूर्याचा मोठा निर्णय

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकल्यानंतर बोलताना संघाची रणनीती स्पष्ट केली. त्याने सांगितले की, 'आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याबद्दल आम्ही खूश आहोत.' हेच क्रिकेट आम्हाला खेळायचे आहे, असंही सूर्या म्हणाला आहे. शुभमन गिल बद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, शुभमन गिलला धावा कशा करायच्या हे चांगले माहीत आहे. त्याच्यासोबत खेळताना विकेट्स दरम्यान हार्ड रन करणं आवश्यक असते. आजच्या मॅचसाठी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि आम्ही सेम टीमसोबत खेळणार आहोत, अशी माहिती सूर्याने दिली.
advertisement

प्लेइंग इलेव्हन निवडताना गंभीरची मनमानी

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला पुन्हा संधी मिळाली नाही. अर्शदीप टीम इंडियाचा स्टार बॉलर आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तो बॉलर ठरलाय. तरी देखील गंभीरच्या लाडक्या खेळाडूसाठी सूर्याने अर्शदीपला बाहेर बसवलंय.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
advertisement
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Aus 2nd T20 : मेलबर्नवर सूर्याने पुन्हा केली घोडचूक, टॉसवेळी काय घेतला निर्णय? पाहा टीम इंडियाची Playing 11
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement