IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियात शुक्रवारी दुसऱ्या T20 चा थरार, मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!

Last Updated:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजची दुसरी मॅच शुक्रवार 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलियात शुक्रवारी दुसऱ्या T20 चा थरार, मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!
भारत-ऑस्ट्रेलियात शुक्रवारी दुसऱ्या T20 चा थरार, मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजची दुसरी मॅच शुक्रवार 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. याआधी कॅनबेराच्या मनुका ओव्हलमध्ये सीरिजची पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. यानंतर आता मेलबर्नमध्ये शुक्रवारी दोन्ही टीम धमाका करण्यासाठी मैदानात उतरतील. सीरिजच्या पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीतला नंबर वन बॅटर अभिषेक शर्मा कमाल दाखवू शकला नाही. पण शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी त्यांच्या बॅटिंगने प्रभावीत केलं.
मागच्या महिन्यात आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारा अभिषेक मेलबर्नमध्ये मोठी खेळी करण्यासाठी मैदानात उतरेल. सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताने डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं होतं. अर्शदीप सिंग टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे, तरीही त्याला खेळण्याची संधी मिळत नाहीये. दुसऱ्या टी-20 सामन्यातही अर्शदीप सिंगला बेंचवरच बसावं लागण्याची शक्यता आहे.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी टी-20 दुपारी 1.45 वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर या मॅचचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं रेकॉर्ड

सर्वाधिक स्कोअर : 6 नोव्हेंबर 2022, झिम्बाब्वेविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 186/5
सगळ्यात कमी स्कोअर : 1 फेब्रुवारी, 2008 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17.3 ओव्हरमध्ये 74/10
सगळ्यात मोठा विजय (रनच्या अंतराने) : भारताने 6 नोव्हेंबर 2022 ला झिम्बाब्वेचा 71 रनने पराभव केला.
advertisement
सर्वाधिक रन : विराट कोहली 5 सामन्यांमध्ये 198 रन
सर्वाधिक स्कोअर : विराट कोहली 23 ऑक्टोबर 2022, पाकिस्तानविरुद्ध 53 बॉलमध्ये नाबाद 82
सर्वोत्तम बॅटिंग सरासरी : विराट कोहली 99.00
सर्वोत्तम स्ट्राईक रेट (कमीत कमी 25 बॉल) : सूर्यकुमार यादव (217.14)
सर्वाधिक अर्धशतक : विराट कोहली, 2 अर्धशतक
सर्वाधिक शून्य : श्रीसंत आणि सेहवाग 1-1 वेळा शून्यवर आऊट
advertisement
सर्वाधिक सिक्स : विराट कोहली, 5 सिक्स
सर्वाधिक विकेट : हार्दिक पांड्या, 3 मॅचमध्ये 6 विकेट
सर्वाधिक आऊट : एमएस धोनी 3 सामन्यात 6 विकेट, 3 कॅच आणि 3 स्टम्पिंग
सर्वाधिक कॅच : भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव 3-3 कॅच
सर्वोत्तम पार्टनरशीप : 23 ऑक्टोबर 2022 पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्या विराट कोहली, पाचव्या विकेटसाठी 113 रन
advertisement
सर्वाधिक मॅच : रोहित शर्मा 6 टी-20 आंतरराष्ट्रीय
कर्णधार म्हणून सर्वाधिक मॅच : एमएस धोनी, 3 टी-20 आंतरराष्ट्रीय
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियात शुक्रवारी दुसऱ्या T20 चा थरार, मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement