शिंदेसेनेला धक्का, दिलीप भोईर यांना 7 वर्षांची शिक्षा; अलिबाग न्यायालयाचा निर्णय
- Published by:Prachi Amale
Last Updated:
दिलीप भोईर यंदाची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होते मात्र त्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
रायगड : भाजपमधून शिंदे गटात गेलेले अलिबागचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर ऊर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 जणांवर मारहाण प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे दिलीप भोईर यांच्यासह त्यांच्या 21 कार्यकर्त्यांविरोधात एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज अखेर यावर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत सुमारे 7 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.तर दुसरीकडे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच आमदार महेंद्र दळवी यांचे जवळचे निकटवर्ती असलेले दिलीप भोईर यंदाची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार होते मात्र त्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटासाठी देखील हा मोठा धक्का म्हणावा लागेल.
advertisement
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे 2013- 14 मध्ये कलिंग जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन थले कुटुंबीयांना मारहाण केली होती. याप्रकरणी दिलीप भोईर यांच्यासह इतर 24 जणांविरोधात मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा निकाल आज जिल्हा न्यायालय अलिबाग या ठिकाणी दिलीप भोईर यांच्यासह 20 जणांवर सात वर्षाची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड असा लावण्यात आला आहे
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
October 30, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेसेनेला धक्का, दिलीप भोईर यांना 7 वर्षांची शिक्षा; अलिबाग न्यायालयाचा निर्णय


