तोच प्लॉट अन् तिच स्टोरी... 17 मुलं किडनॅप, रोहित आर्यने 3 वर्षांपूर्वी चित्रपटात घडलं तेच मुंबईत केलं!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mumbai hostage incident : मुंबईतील पवई परिसरात दिवसाढवळ्या एका माथेफिरूने एका स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना बंधक ठेवले. या घटनेने काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची आठवण करून दिली आहे.
मुंबई: मुंबईतील पवई परिसरात दिवसाढवळ्या एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली. एका माथेफिरूने एका स्टुडिओमध्ये तब्बल १७ मुलांना बंधक ठेवले. विशेष म्हणजे, ही मुले एका वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी पवईत आली होती. दुपारचे दीड वाजून गेले तरी मुले जेवणासाठी बाहेर आली नाहीत, तेव्हा पालकांना संशय आला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम हिने 'नैना' नावाच्या शिक्षिकेची मुख्य भूमिका साकारली होती. नैना तिच्या होणाऱ्या पतीच्या घरीच एक प्लेस्कूल चालवते. नेहमीप्रमाणे पालक मुलांना सुरक्षितपणे प्लेस्कूलमध्ये सोडून जातात. पण थोड्याच वेळात नैना पोलीस स्टेशनमध्ये फोन करून १६ मुलांना बंधक बनवल्याचे जाहीर करते.
advertisement
advertisement


