अक्षय कुमारचा को-स्टार, अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी भोगली 7 वर्ष शिक्षा; कमबॅक झालं फेल, आता परदेशात विकतोय कपडे
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversy : एकेकाळी त्याने अक्षय कुमार आणि कंगना राणौत सारख्या कलाकारांसोबत काम केलं, पण आज तो लाइमलाईटपासून दूर कपड्यांचा व्यवसाय करत असल्याची चर्चा आहे.
advertisement
advertisement
advertisement
पेप्सीच्या एका जाहिरातीने दिग्दर्शक सुधीर मिश्रांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी शायनीला 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून लॉन्च केले. याच वर्षी त्याचे चार चित्रपट रिलीज झाले, जी त्या काळात एक मोठी गोष्ट होती. शायनीला खरी ओळख मिळाली ती अनुराग बसू यांच्या 'गैंगस्टर' चित्रपटातून, ज्यात तो कंगना रनौतसोबत मुख्य भूमिकेत होता.
advertisement
याशिवाय त्याने 'वो लम्हे', 'लाइफ इन ए मेट्रो' आणि 'भूल भुलैया' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात तो जॉन अब्राहम आणि के.के. मेननसारख्या कलाकारांना टक्कर देणारा मानला जात होता. याशिवाय त्याने 'वो लम्हे', 'लाइफ इन ए मेट्रो' आणि 'भूल भुलैया' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात तो जॉन अब्राहम आणि के.के. मेननसारख्या कलाकारांना टक्कर देणारा मानला जात होता.
advertisement
मात्र, २००९ मध्ये शायनी आहुजाचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. २०११ मध्ये मुंबईच्या फास्ट-ट्रॅक कोर्टाने वैद्यकीय अहवाल आणि डीएनए पुराव्यांच्या आधारावर शायनीला दोषी ठरवत ७ वर्षांची शिक्षा सुनावली.
advertisement
विशेष म्हणजे, पीडितेने नंतर आपला जबाब मागे घेतला होता, तरीही न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप गंभीर मानून शिक्षा कायम ठेवली. जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर शायनीने २०१५ मध्ये अनीस बज्मी यांच्या 'वेलकम बॅक' चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. चित्रपट हिट झाला, पण शायनीचे करियर रुळावर आले नाही.
advertisement


