Mumbai : रोहित आर्याचं एन्काऊंटर, सव्वादोन तासांच्या थरारानंतर 17 मुलांची सुटका, पवईच्या स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना किडनॅप करणाऱ्या आरोपी रोहित आर्य याचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं आहे, ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना किडनॅप करणाऱ्या आरोपी रोहित आर्य याचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं आहे, ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्य याच्या हाताला गोळी लागली, यानंतर रक्तस्त्राव झाल्यामुळे रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. रोहित आर्य याने मुलांच्या पालकांना धमकीचे व्हिडिओ पाठवले होते.
पवईच्या स्टुडिओमध्ये काय झालं?
तब्बल सव्वादोन तास मुलांच्या सुटकेचा थरार चालला. वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती. मागच्या 6 दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी येत होती. दुपार झाली तरी मुलं जेवायला आली नाहीत, त्यामुळे पालकांची चिंता वाढली. यानंतर दुपारी 1.45 वाजता पालकांनी पोलिसांना फोन केला. रोहित आर्य याने 17 मुलं आणि एका वयस्कर माणसाला ओलीस ठेवलं होतं. दुपारी 4 वाजता पोलीस बाथरूममधून इमारतीमध्ये शिरले. पोलीस आल्याच दिसताच रोहित आर्यने पोलिसांना त्याच्याकडे असलेल्या एअरगनने गोळी मारली, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनाही गोळीबार करावा लागला.
advertisement
पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्य याच्या हाताला गोळी लागली, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. रोहित आर्य याच्याकडे एअरगन आणि केमिकलही सापडलं आहे. रोहित आर्य मानसिक आजारी असल्याची माहिती समोर आली आहे.
काय होत्या रोहित आर्यच्या मागण्या?
आरोपीचे काही पैसे सरकारी प्रोजेक्टमध्ये लावले होते. त्याने कोट्यवधीची गुंतवणूक केली होती, मात्र त्याचे नुकसान झाले. नुकसानासाठी त्याने सरकारला जबाबदार ठरवले होते. यामुळे त्यानी आपली बाजू सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यक्तीने नागपूरमध्ये स्वच्छचा मोहीम राबवली होती. त्यावेळी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी हा निधी त्याला त्यावेळी मिळाला नाही. मात्र त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला. हा निधी न मिळाल्याने आर्या आंदोलन करत होता. त्याने याआधी आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं.
advertisement
मुलांना कोंडून ठेवल्यानंतर रोहित आर्यने एक व्हिडिओ शेअर केला. 'मी एक योजना आखली, मला काही लोकांसोबत बोलायचं आहे. माझ्या मागण्या मोठ्या आर्थिक नाहीयेत, तर नैतिक आहेत. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरे मिळवायची आहेत. मी दहशतवादी नाही. मी आक्रमक हालचाली करून चिथावणी देऊ शकतो. मला उत्तेजित करू नका', असं रोहित आर्य त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : रोहित आर्याचं एन्काऊंटर, सव्वादोन तासांच्या थरारानंतर 17 मुलांची सुटका, पवईच्या स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं?


