IND vs AUS 2nd T20I : पहिली मॅच धुवून निघाली, आता मेलबर्नवर पाऊस घालणार खोडा? Weather Report पाहून मार्शला आली चक्कर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Australia 2nd T20I : दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. टी-ट्वेंटी मालिकेतील हा महत्त्वाचा सामना असल्याने आता दोन्ही संघांचं टेन्शन वाढलंय.
IND vs AUS 2nd T20I, Melbourne Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाईल. या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. कॅनबेरा येथील पहिला टी-ट्वेंटी सामना पावसामुळे वाया गेला होता, एकही डाव पूर्ण झाला नव्हता. अशातच आता दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. टी-ट्वेंटी मालिकेतील हा महत्त्वाचा सामना असल्याने आता दोन्ही संघांचं टेन्शन वाढलंय.
संध्याकाळी 6 वाजता पाऊस सर्वाधिक
Accuweather.com नुसार, मेलबर्नमधील हवामान शुक्रवारी संपूर्ण ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाचं संकट आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता पाऊस सर्वात जास्त पडेल, त्यावेळी पावसाची शक्यता 66 टक्के असेल. संध्याकाळी 7 वाजता ते 49 टक्के कमी होईल आणि रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 13 टक्के असेल. त्यामुळे सामना वेळेवर सुरू होईल की नाही, यावर शंका उपस्थित केली जात आहे. जर पाऊस असेल तर मॅच वेळेवर नाही तर उशिरा कमी ओव्हरमध्ये खेळवली जाऊ शकते.
advertisement
सिरीजवर परिणाम होण्याची शक्यता
दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना स्थानिक वेळेनुसार (भारतीय वेळेनुसार दुपारी पावने दोन वाजता) सुरू होणार आहे. याचा अर्थ असा की एमसीजीवरील पावसाचा खेळावर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. सतत पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरी, चाहते कमीत कमी वेळात खेळाची मजा घेऊ शकतात. टी-20 मालिकेतील उर्वरित तीन सामने अनुक्रमे होबार्ट (2 नोव्हेंबर), गोल्ड कोस्ट (6 नोव्हेंबर) आणि ब्रिस्बेन (8 नोव्हेंबर) येथे खेळवले जातील.
advertisement
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (C), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा.
ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श (C), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड, शॉन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, तनवीर संघा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 2nd T20I : पहिली मॅच धुवून निघाली, आता मेलबर्नवर पाऊस घालणार खोडा? Weather Report पाहून मार्शला आली चक्कर!


