IND vs AUS : रोहितची सुपर स्ट्रॅटजी... एका झटक्यात राणा व्हिलनचा हिरो झाला, ड्रेसिंग रूममधून गंभीरही पाहत राहिला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये व्हिलन ठरलेला हर्षित राणा तिसऱ्या मॅचमध्ये हिरो ठरला. रोहित शर्माने हर्षितला केलेल्या मदतीनंतर त्याने पुढच्याच ओव्हरला विकेट मिळवली.
सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा पहिल्या दोन्ही वनडेमध्ये दारूण पराभव झाला, सोबतच भारताने सीरिजही गमावली. या पराभवानंतर हर्षित राणावर सर्वाधिक टीका झाली. तिसऱ्या वनडेमधून हर्षितला बाहेर करण्याची मागणीही क्रिकेट चाहत्यांनी केली, पण तरीही कर्णधार गिल आणि कोच गौतम गंभीरने राणावर विश्वास दाखवला आणि त्याला खेळवलं. हर्षित राणाने त्याच्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवला. या सामन्यात हर्षितने 8.4 ओव्हरमध्ये 39 रन देऊन 4 विकेट घेतल्या. हर्षित राणाची वनडे क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी होती.
हर्षित राणाने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये 4 ओव्हर बॉलिंग करून एकही विकेट न घेता 21 रन दिले, पण दुसऱ्या स्पेलमध्ये मॅचचं चित्रच बदललं. हर्षित राणाच्या या कामगिरीमध्ये श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मानेही योगदान दिलं.
अय्यरचा कमाल कॅच
हर्षित राणाच्या सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ऍलेक्स कॅरीने मोठा शॉट मारला, पण श्रेयस अय्यरने शॉर्ट थर्ड मॅनवर मागे पळत जात उत्कृष्ट कॅच पकडला. हर्षित राणाला ऍलेक्स कॅरीची विकेट मिळाली, पण विकेट श्रेयस अय्यरची होती, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कॅरीची विकेट मिळाल्यानंतर मग रोहित शर्माच्या रणनीतीने राणाला पुढची विकेट मिळाली.
advertisement
Seeing Rohit Sharma pull Harshit aside for a quick chat, then boom—wicket falls right in that over? That's straight-up captain magic, no cap. Rohit doesn't just talk the game, he lives it, leading the pack like it's second nature. Miss this guy firing up the team every match.… pic.twitter.com/aDnMMRjm0w
— Dr Aakriti (@draakriti01) October 25, 2025
advertisement
रोहितची चाल, राणाला मिळाली विकेट
हर्षित राणाने पुढच्या ओव्हरच्या आधी रोहित शर्मासोबत बराच वेळ चर्चा केली. मायकल ओवन नुकताच बॅटिंगला आला होता, त्यामुळे रोहितने स्लिपमध्ये फिल्डर लावायला राणा आणि गिलला सांगितलं. यानंतर रोहित स्वत: स्लिपमध्ये फिल्डिंगला उभा राहिला, हर्षित राणानेही मग योग्य ठिकाणी बॉलचा टप्पा ठेवला आणि ओवनच्या बॅटच्या एजला बॉल लागून रोहितच्या हातात कॅच गेला. इनिंग संपल्यानंतर हर्षित राणाने त्याच्या यशाचं श्रेय रोहित शर्माला दिलं.
advertisement
हर्षित राणाने या सामन्यात ऍलेक्स कॅरी, कुपर कॉनली, मिचेल ओवन आणि जॉश हेजलवूडची विकेट घेतली. हर्षितच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा 46.4 ओव्हरमध्ये 236 रनवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 237 रनचं आव्हान टीम इंडियाने अगदी सहज पार केलं. रोहित शर्माचं नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 9 विकेटने जिंकला. रोहित शर्माने नाबाद 121 आणि विराट कोहलीने नाबाद 74 रन केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : रोहितची सुपर स्ट्रॅटजी... एका झटक्यात राणा व्हिलनचा हिरो झाला, ड्रेसिंग रूममधून गंभीरही पाहत राहिला!


