IND vs AUS : गंभीर-सूर्याचं एक्सपिरिमेंट पुन्हा फेल, 15 बॉलमध्ये 4 विकेट, मुंबईच्या खेळाडूचा बळी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. 20 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 8 विकेट गमावून 167 रन एवढा झाला आहे.
क्वीन्सलँड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं आहे. 20 ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर 8 विकेट गमावून 167 रन एवढा झाला आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला 6.4 ओव्हरमध्ये 56 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली, पण अभिषेक शर्मा आऊट झाल्यानंतर भारताची बॅटिंग गडगडली. शेवटच्या 6 ओव्हरमध्ये टीम इंडियाला फक्त 46 रन करता आल्या, ज्यातल्या 14 रन अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हरमध्ये केल्या. 14.1 ते 16.4 या 15 बॉलमध्ये टीम इंडियाने त्यांच्या 4 विकेट गमावल्या.
अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण हा निर्णयही अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये 22 रन करून दुबे आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव 20, तिलक वर्मा 5, जितेश शर्मा 3 रनवर आऊट झाले. अक्षर पटेलने 11 बॉलमध्ये नाबाद 21 रन केल्यामुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ऍडम झम्पाला प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉयनिस यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये चार बदल आहेत. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आणि तिसरा सामना भारताने जिंकला. चौथ्या टी-20 मध्ये विजय मिळवणारी टीम सीरिजमध्ये हरू शकणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 3:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गंभीर-सूर्याचं एक्सपिरिमेंट पुन्हा फेल, 15 बॉलमध्ये 4 विकेट, मुंबईच्या खेळाडूचा बळी!


