advertisement

IND vs ENG : 4 ऑगस्टला तेंडुलकर-अंडरसनला का बोलावलं नाही? गावसकरांनी इंग्लंड बोर्डाला विचारला जाब!

Last Updated:

भारत आणि इंग्लंडमधील पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्ट रोजी संपली, पण अँडरसन-तेंडुलकर मालिका संपल्यानंतरही इंग्लंड क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

4 ऑगस्टला तेंडुलकर-अंडरसनला का बोलावलं नाही? गावसकरांनी इंग्लंड बोर्डाला विचारला जाब!
4 ऑगस्टला तेंडुलकर-अंडरसनला का बोलावलं नाही? गावसकरांनी इंग्लंड बोर्डाला विचारला जाब!
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्ट रोजी संपली, पण अँडरसन-तेंडुलकर मालिका संपल्यानंतरही इंग्लंड क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ईसीबीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना उघडपणे सांगितले की जेव्हा ही सीरिज पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावाने खेळली जात होती, तेव्हा दोन्ही खेळाडूंना ट्रॉफी देण्यासाठी तिथे का बोलावले गेले नाही?

सुनील गावसकरांचा ईसीबीवर निशाणा

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले की प्रेझेन्टेशन वेळी पतौडी कुटुंबातील कोणालाही तिथे बोलावले नव्हते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की ही सीरिज जिंकणाऱ्या टीमच्या कर्णधाराला पतौडी ट्रॉफी दिली जाईल, परंतु जेव्हा मालिका 2-2 अशी बरोबरीत होती, तेव्हा त्यांच्या निर्णयाला काही अर्थ नव्हता. गावसकर पुढे म्हणाले की, जर सीरिज अशीच बरोबरीत राहिली तर या पदकाचा काही उपयोग नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या विजेत्याला पतौडी ट्रॉफी देणे हा निर्णय अधिक चांगला असता.
advertisement
सुनील गावस्कर यांनी केवळ या प्रकरणावरूनच नव्हे तर सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांना प्रेझेन्टेशनसाठी आमंत्रित न केल्याबद्दल ईसीबीवर निशाणा साधला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावाची ही पहिली सीरिज होती. माझ्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू मालिकेदरम्यान तिथे उपस्थित होते. प्रेझेन्टेशन सेरेमनीला त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. त्यांना का आमंत्रित केले नाही? असा प्रश्न गावसकरांनी विचारला.
advertisement

भारत-इंग्लंड सीरिज ड्रॉ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टेस्ट सीरिज 2-2 अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर भारताचा दुसऱ्या आणि पाचव्या सामन्यात विजय झाला. दोन्ही टीममधील चौथा टेस्ट ड्रॉ झाली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : 4 ऑगस्टला तेंडुलकर-अंडरसनला का बोलावलं नाही? गावसकरांनी इंग्लंड बोर्डाला विचारला जाब!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement