IND vs NZ : न्यूझीलंडने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये मोठा बदल; वॉशिंग्टन सुंदरच्या जागी 'हा' खेळाडू मैदानात!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शुभमन गिलने टॉस उडवला, मात्र टीम इंडिया टॉस हरली असून न्यूझिलंडने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा थरार आता राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर पोहोचला आहे. पहिल्या सामन्यात वडोदरा येथे निसटता पण थरारक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया मालिका खिशात टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. शुभमन गिलने टॉस उडवला, मात्र टीम इंडिया टॉस हरली असून न्यूझिलंडने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे आता त्याच्याजागी नितीश कुमार रेड्डीला टीममध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.
वडोदऱ्यातील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून रोहित शर्माही मोठ्या खेळीसाठी सज्ज आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांच्या फलंदाजीने गेल्या सामन्यात छाप पाडली होती, तर हर्षित राणाच्या अष्टपैलू कामगिरीने संघाला बळकटी दिली आहे. ही विजयी घोडदौड आज राजकोटमध्येही कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडचा संघ आज विजयासाठी जीवाचे रान करेल. गेल्या सामन्यात ३०० हून अधिक धावा कुटून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. कॉनवे, मिचेल आणि निकोल्स या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर मालिकेत बरोबरी साधण्याचा किवींचा प्रयत्न असेल.
भारत विरुद्ध न्यूझिलंड हेड टू हेड विचार करायचा झाला तर वन डे 121 सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 63 सामने जिंकले आहेत. तर 50 सामने न्यूझिलंडने जिंकले आहेत. 1 सामना टाय झाला आहे. तर भारतीय मैदानात 41 सामने झाले त्यापैकी भारताने 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर सीरिज टीम इंडिया जिंकेल मात्र हा सामान जर जिंकणं मुश्कील झालं तर मात्र तिसरा सामना पाहाणं आणि जिंकणं टीम इंडियासाठी जास्त मोठं आव्हान असेल.
advertisement
भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
न्यूझिलंड संघ: डेवोन कॉन्वे, हेनरी निकोल्स, विल यंग, डेरिल मिचेल, मिचेल हे (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जॅक फोक्स, जेडन लेनोक्स
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 1:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : न्यूझीलंडने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये मोठा बदल; वॉशिंग्टन सुंदरच्या जागी 'हा' खेळाडू मैदानात!








