Cash For Votes Mumbai: बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजप उमेदवाराच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री आणि त्यानंतर जे घडलं...

Last Updated:

BMC Electiion: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी बोरिवलीतील राजेंद्र नगर भागात (प्रभाग क्रमांक १४) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री अन् त्यानंतर जे घडलं...
बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री अन् त्यानंतर जे घडलं...
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी बोरिवलीतील राजेंद्र नगर भागात (प्रभाग क्रमांक १४) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप उमेदवार सीमा शिंदे यांच्याकडून एका हॉलमध्ये जेवणावळ आणि पैसे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते नयन कदम यांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात रात्री उशिरा मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

नेमकं प्रकरण काय?

मनसेचा आरोप आहे की, मंगळवारी रात्री प्रचार थांबल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एका स्थानिक हॉलमध्ये मोठ्या जेवणावळीचे आयोजन केले होते. "आम्ही हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला अडवले. भाजपचे लोक पैसे वाटप करत होते, मात्र पोलिसांच्या मदतीने त्यांना पळवून लावण्यात आले," असा दावा नयन कदम यांनी केला आहे.
advertisement
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी लोक गाड्यांतून येत होते, थेट आत जाऊन बाहेर पडत होते आणि कोणताही संवाद किंवा जेवण न करता लगेच निघून जात होते. यामुळे पैसे वाटपाचा संशय बळावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, कार्यक्रमस्थळी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी काही लोकांना गेटवर तैनात करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान अशा प्रकारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
advertisement

'बर्थडे बॉय' कुठे आहे? मनसेचा बोचरा सवाल...

भाजपकडून हा आरोप फेटाळण्यात आला असून तिथे केवळ एका वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावर मनसेने सडेतोड सवाल करत "जर ही बर्थडे पार्टी होती, तर ज्याचा वाढदिवस आहे तो 'बर्थडे बॉय' नक्की कुठे आहे?" अशी विचारणा केली आहे.

सरकारी वकील पतीच्या सहभागावरून नवा वाद...

advertisement
या प्रकरणात मनसेने आणखी एक कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आहे. भाजप उमेदवार सीमा शिंदे यांचे पती हे सरकारी वकील (PP - Public Prosecutor) आहेत. "एका जबाबदार सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे राजकीय प्रचारात किंवा संशयास्पद हालचालींमध्ये सहभाग घेता येतो का?" असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी...

advertisement
या सर्व प्रकारानंतर मनसे आक्रमक झाली आहे. सरकारी पदाचा गैरवापर आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप उमेदवारावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

भाजपने आरोप फेटाळले...

मनसेच्या पैसे वाटपाचे सर्व आरोप भाजप उमेदवार सीमा शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. मनसेचे आरोप फेटाळून लावताना सीमा शिंदे यांनी मनसैनिकांवर उलट आरोप करत मनसेच्या ५०-६० कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. बोरिवलीतील भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मनसेवर आरोप करताना म्हटले की, सीमा शिंदे यांच्या मनसेकडून 50 ते 60 लोकांच्या जमावाने शिवीगाळ आणि हल्ला केला. महिलेवर हल्ला करणारा ही मनसेची कुठली संस्कृती अशा देखील प्रश्न आमदार संजय उपाध्याय यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cash For Votes Mumbai: बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजप उमेदवाराच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री आणि त्यानंतर जे घडलं...
Next Article
advertisement
Cash For Votes Mumbai: बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजप उमेदवाराच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री आणि त्यानंतर जे घडलं...
बोरिवलीत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपच्या 'बर्थडे पार्टी'त मनसेची एन्ट्री आणि त्यान
  • बोरिवलीतील राजेंद्र नगर भागात (प्रभाग क्रमांक १४) राजकीय वातावरण चांगलेच तापले

  • भाजप उमेदवार सीमा शिंदे यांच्याकडून एका हॉलमध्ये जेवणावळ आणि पैसे वाटप सुरू असल्

  • या प्रकारामुळे परिसरात रात्री उशिरा मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

View All
advertisement