IND vs NZ : रोहितने असं खेळायला नको हवं होतं, 140 कोटी जनतेची निराशा, मॅचमध्ये काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले आहेत.खरं तर या सामन्यात टीम इंडियाला सलामी जोडीकडून एका मोठ्या पार्टनरशीपची आवश्यकता होती. पण ती होऊ न शकल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
India vs New Zealand 3rd Odi : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडने भारतासमोर 337 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सूरूवात चांगली झाली नाही आहे. कारण टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले आहेत.खरं तर या सामन्यात टीम इंडियाला सलामी जोडीकडून एका मोठ्या पार्टनरशीपची आवश्यकता होती. पण ती होऊ न शकल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडी मोठ्या धावा करेल अशी अपेक्षा होती. पण दोन्ही सलामीविरांनी शस्त्रे टाकली आहेत. त्याचं झालं असं की झाकरी फोल्कसच्या चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहितच्या बॅटीला कड लागून न्यूझीलंडच्या विकेटकिपरच्या हातात बॉल गेला होता.पण विकेटकिपरने हा बॉल सोडल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं होतं.
advertisement
रोहितला एकदा जीवनदान मिळाल्यानंतर तो सावधपणे खेळेल अशी अपेक्षा होती, पण त्याने त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर रोहित थेट हातात कॅच देऊन बसला होता.त्यामुळे रोहित अवघ्या 11 धावांवर बाद झाला आहे. रोहितला एकदा जीवनदान मिळाल्यानंतर त्याला पुन्हा सावधपणे आणि विकेट टीकवून खेळण्याची आवश्यकता होती.पण त्याने विकेट फेकल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.
advertisement
रोहित पाठोपाठ शुभमन गिलची देखील विकेट पडली आहे. कायली जेमिन्सन टाकलेला बॉल गिलला कळालाच नाही आणि त्यांच्या दांड्या उडवून गेल्या होत्या. त्यामुळे कॅप्टन गिल 23 धावांवर बाद झाला. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर विकेटची रांगच लागली आहे. कारण श्रेयस अय्यर 3 वर तर केएल राहुल 1 धावांवर बाद झाला आहे. तर विराटने भारताचा डाव सावरला आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 7:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : रोहितने असं खेळायला नको हवं होतं, 140 कोटी जनतेची निराशा, मॅचमध्ये काय घडलं?







