चंद्राचं मकर राशीत गोचर, चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब; होणार जबरदस्त फायदा!

Last Updated:

ज्योतिषशास्त्रात चंद्राचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. आज 'मौनी अमावस्या' असून दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी चंद्राने धनु राशीतून बाहेर पडून शनीची रास असलेल्या मकर राशीत प्रवेश केला आहे.

News18
News18
Chandra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रात चंद्राचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. आज 'मौनी अमावस्या' असून दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी चंद्राने धनु राशीतून बाहेर पडून शनीची रास असलेल्या मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत आधीच सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र विराजमान आहेत. आता चंद्राच्या आगमनामुळे तिथे शक्तिशाली 'पंचग्रही राजयोग' निर्माण होत आहे. शनीच्या राशीत होणारे हे चंद्राचे संक्रमण काही राशींसाठी भाग्योदयाचे ठरणार असून त्यांना अपेक्षित यश मिळवून देणारे आहे.
मकर राशीत ग्रहांचा महामेळावा
जेव्हा पाच ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा त्या राशीची ऊर्जा प्रचंड वाढते. चंद्र हा शीतल ग्रह असून तो मकर राशीत आल्यामुळे मंगळाचा आवेश आणि शनीच्या शिस्तीचा ताळमेळ बसवण्यास मदत करेल. यामुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील.
वृषभ
आर्थिक समृद्धी वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण नवव्या स्थानी होत आहे. प्रदीर्घ काळ रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायातून मनचाहा नफा मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबात आनंदाच्या बातम्या मिळतील.
advertisement
मिथुन
अचानक प्रगती तुमच्यासाठी हा काळ संमिश्र असला तरी चंद्राचे गोचर सकारात्मक फळे देईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. गूढ विद्या किंवा संशोधनात रस असणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होऊ शकतो.
कन्या
प्रेम आणि संतान सुख कन्या राशीच्या पाचव्या स्थानी हा पंचग्रही योग होत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे; परीक्षेत किंवा स्पर्धेत मनचाहे यश मिळेल. कला क्षेत्रातील लोकांसाठी नवनवीन संधी चालून येतील. संततीकडून चांगली बातमी मिळेल आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.
advertisement
वृश्चिक
पराक्रम आणि साहस तुमच्या तिसऱ्या भावात हे संक्रमण होत असल्याने तुमचे धैर्य वाढेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. लहान भावंडांकडून मदत मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. प्रवासातून तुम्हाला लाभ होईल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मकर
नेतृत्व आणि यश तुमच्याच राशीत हा राजयोग तयार होत असल्याने तुम्ही या काळाचे मुख्य केंद्र असाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसेल. ज्या योजना तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आखत होतात, त्या आता अंमलात आणण्याची वेळ आली आहे. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील लोकांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
चंद्राचं मकर राशीत गोचर, चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब; होणार जबरदस्त फायदा!
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement